विशेष प्रतिनिधी
पुणे : छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याच्या वेदना शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना झाल्या. पण त्यांच्या पक्षातून म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून त्या भुजबळांना काही का मिळवून देईनात??, असा सवाल तयार झाला आहे. Supriya Sule feels pain over injustice done to Bhujbal
छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्याच्या घटनेला आता आठवडा उलटून गेला त्या आठवडाभरात सुप्रिया सुळे यांनी कुठली प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती आठवडाभरानंतर पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी भुजबळांवर अन्याय झाल्याची वेदना केली.
भुजबळांच्या पक्षातील अंतर्गत संबंधांची मला माहिती नाही, पण माझे पोट मोठे आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी पोटातल्या ओठांवर आणायच्या नसतात, असे सुप्रिया सुळे नमूद केले.
भुजबळांना तुरुंगात जावे लागले. त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने काय दुःख भोगले हे मी जवळून पाहिले. त्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातले स्थान आणि कर्तृत्व मोठे आहे. पवार साहेबांबरोबरच्या अनेक संघर्षांमध्ये भुजबळ साहेबांनी त्यांना साथ दिली. भुजबळांचे कर्तृत्व आणि नेतृत्व महाराष्ट्र विसरणार नाही. त्यांच्या पक्षाने मंत्रीपद न देऊन त्यांच्यावर अन्याय केला. त्याच्या मला वेदना आहेत, अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी भावना व्यक्त केल्या.
पण मूळात अजितदादांच्या गोटात काय चालले आहे, ते बघून येतो, असे सांगून भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत का निघून गेले??, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याचवेळी भुजबळांना पक्षात का रोखून धरले नाही??, भुजबळ जर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आले, तर त्यांच्या मागणीनुसार फवारांच्या राष्ट्रवादीकडे द्यायला काही शिल्लक उरलेय का??, हे सवाल कोणी सुप्रिया सुळे यांना विचारले नाहीत. त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरे सुप्रिया सुळे यांनी दिली नाहीत. भुजबळांवर अन्याय झाल्याची वेदना मात्र त्यांनी आवर्जून व्यक्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App