सोलापूर : एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आईच्या साडीने गळफास घेऊन केली आत्महत्या


जे एसटी कर्मचारी कामावर नाहीत या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या घरात आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. Solapur: The son of an ST employee committed suicide by hanging himself with his mother’s sari


विशेष प्रतिनिधी

सोलापूर : मागील तीन महिन्यापासून एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे.दरम्यान मागील तीन महिन्यांपासून जे एसटी कर्मचारी कामावर नाहीत या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या घरात आर्थिक चणचण जाणवू लागली आहे.

या कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.स्थानिक कर्मचाऱ्यांना मित्र, नातेवाइक मदतीसाठी पुढे आले. मात्र, परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे तालुक्यात कुणी नातेवाइक नसल्याने ते मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलाने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा दुदैवी घटना सोलापुरात घडली आहे.



सोलापूर आगारातील एसटी कर्मचारी तुकाराम माळी यांच्या मुलाने आर्थिक विवंचनेतून केली आत्महत्या आहे.अमर तुकाराम माळी असे मृत मुलाचे नाव आहे.या प्रकारामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.अमर माळी याने बुधवारी राहत्या घरी आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर कोंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Solapur: The son of an ST employee committed suicide by hanging himself with his mother’s sari

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात