भाजप मुलायम सिंह यादव यांच्या घरात सुरुंग लावण्यात यशस्वी ; यादवांच्या सुनेचा भाजपात प्रवेश


अपर्णा यादव यांनी लखनऊच्या कँट मतदारसंघातून २०१७ ला विधानसभा निवडणूक लढवली होती. BJP succeeds in planting landmine in Mulayam Singh Yadav’s house; Yadav’s daughter-in-law joins BJP


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण चांगलेच तापले असून फोडाफोडीचे सत्र सुरूच आहे. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला मोठा फटका बसला आहे. कारण मुलायम कुटुंबातील धाकटी सून अपर्णा यादव यांनी बुधवारी ( 19 जानेवारी ) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.सपाकडून लखनौ कॅन्टमधून उमेदवारी दिली न गेल्याच्या नाराजीतून अपर्णा भाजपत गेल्याची चर्चा आहे.

कोण आहे अपर्णा यादव?

मुलायम सिंह यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतीक यादव हे अपर्णा यादव यांचे पती आहेत.अपर्णा यादव यांनी लखनऊच्या कँट मतदारसंघातून २०१७ ला विधानसभा निवडणूक लढवली होती. पण निवडणुकीत त्यांचा भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी पराभव केला. मात्र, त्या दुसऱ्या क्रमांकावर होत्या.अपर्णा यादव यांना जवळपास ६३ हजार मते मिळाली होती.



अखिलेश यादव पहिल्यांदा विधानसभा लढणार

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीदेखील विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढणार आहेत. आजमगढच्या लोकांची सहमती घेतल्यानंतच निवडणूक लढेन, असे त्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.सध्या ते आजमगढ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

BJP succeeds in planting landmine in Mulayam Singh Yadav’s house; Yadav’s daughter-in-law joins BJP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात