फूट, फारकत, फाटाफूट आणि फरफट; “फ” काराच्या फटीत अडकल्या दोन पक्षांच्या शेपट्या!!


नाशिक : महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांची अवस्था आता पुरती प्रादेशिकही उरली नसून ते “फ” कारात अडकलेले पक्ष बनले आहेत. “फ” कारात अडकलेले पक्ष म्हणजे त्या दोन्ही पक्षांभोवती “फ” या अक्षराने फेर धरला आहे!! फूट, फारकत, फाटाफूट आणि फरफट या शब्दांच्या फटीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या राजकीय शेपट्या अडकल्या आहेत. Shivsena and NCP have no more remained full regional parties after splits

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली आहे आणि फूट पडली देखील नाही, असे आजतरी म्हणावे लागेल. कारण यापैकी शिवसेनेतून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेत फूट पडली, असे मानायला तयार नाहीत, तर त्या ऐवजी आपला गट म्हणजेच मूळ शिवसेना पक्ष कायदेशीर दृष्ट्या खरा असल्याचा या दोघांचाही दावा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात पडून आहे.

पण यात एक मात्र निश्चित, की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी मात्र एकमेकांपासून फारकत घेतली आहे. म्हणजे नेत्यांची फारकत आणि दोन्ही बाजूंच्या शिवसैनिकांची फरफट हे शिवसेनेच्या बाबतीत गेले 11 महिने तरी घडत आहे.

जे शिवसेनेच्या बाबतीत घडतेय, तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत घडत आहे. इथे नातेसंबंध जपण्याच्या गोष्टी झाल्या. त्या विशिष्ट मर्यादेपर्यंत टिकल्या, पण शेवटी राजकीय फारकत व्हायची ती झालीच. पण शरद आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे मात्र नाकारले. दोन्ही नेते कायदेशीर फारकतीची लढाई टाळण्यात पुढे आले.


‘’…म्हणूनच उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला’’ बावनकुळेंनी लगावला टोला!


इतकेच काय पण आज सकाळीच अजित पवार हे आपल्याच पक्षाचे नेते आहेत, असे शरद पवार बारामतीत म्हणाले आणि दुपारी साताऱ्यात मात्र आपण असे बोललोच नाही, असे घुमजाव करून मोकळे झाले. सुप्रिया सुळे यांनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत राष्ट्रवादीत फूट पडल्याचे नाकारले. पण अजित पवारांसह त्यांच्या समर्थकांनी वेगळी भूमिका घेऊन शरद पवारांशी फारकत घेतल्याची कबुली दिली. या सगळ्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मात्र फरफट होत आहे.

शरद पवार आत्तापर्यंत काही महिन्यांच्या आणि दिवसांच्या अंतराने घुमजाव करायचे. आपण जनहितासाठी खोटे बोललो, असे म्हणायचे. पण आता तेच शरद पवार महिने आणि दिवस सोडाच, आता ते काही तासांच्या अंतराने घुमजाव करायला लागलेत. हे त्यांच्या बारामती आणि साताऱ्यातल्या वक्तव्यावरून दिसून आले. त्यामुळे घरातल्या नातेसंबंधांमध्ये फारकत नाही, तर राजकीय फारकत आणि त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती??, म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची फरपट हे मात्र निश्चित घडले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे महाराष्ट्रातल्या ठाकरे आणि पवार या दोन बड्या नेत्यांचे दोन मोठे प्रादेशिक पक्ष अशा प्रकारे “फ” कारात अडकले आहेत!!

Shivsena and NCP have no more remained full regional parties after splits

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात