ठाण्यात हिंदी भाषिकांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली होती.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे हिंदी भाषी मेळावा पार पडला. या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तर त्यांच्या टीकेला भाजपाकडूनही प्रत्युत्तर दिले गेले आहे. BJP state president Chandrashekhar Bawankules reply to Uddhav Thackeray’s criticism of Prime Minister Modi
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी म्हटले आहे की, ‘’बऱ्याच दिवसानंतर उबाठाचे नेते उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आणि मजल दर मजल करत त्यांनी ठाणे गाठले. आणि कधी नव्हे ते त्यांना उत्तर भारतीय मतदारांची आठवण झाली आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.’’
याचबरोबर ‘’देशासाठी पंतप्रधान मोदी काय करतात याचे प्रमाणपत्र उद्धव ठाकरे यांनी देण्याची गरज नाही. मोदींमुळे देशाची मान उंचावली आहे. पण उद्धव ठाकरे तुमच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मान शरमेनं खाली झुकली आहे. मोदींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही सोनिया गांधींपुढे मात्र लोटांगण घालत आहात.’’ असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
याशिवाय ‘’माझे कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त तुमच्या भाषणात आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र आदित्य ठाकरेंना मंत्री करताना तुम्हाला सच्चा शिवसैनिक दिसला नाही. त्या प्रामाणिक शिवसैनिकाला दूर ठेवले म्हणूनच कधीकाळी हजारोंच्या उपस्थितीत सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला. तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल.’’ अशा शब्दांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. राम मंदिरासाठी कायदा करा असे आम्ही सांगितले होते. राम मंदिरासाठी कायदा केला नाही. पण, लोकशाही संपविण्यासाठी कायदा करीत आहेत असा आरोप केला. मी मोदी किंवा कोणत्या व्यक्तीविरोधात नाही. मी हुकूमशाहीच्या विरोधात नक्की आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App