विशेष प्रतिनिधी
पुणे : Shiv Sena Thackeray बांगलादेशातील इस्कॉन या मानवतावादी, आध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांविरोधात बांगलादेश सरकार अन्याय व अत्याचार करत असल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौक येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर हिंदूत्वासाठी मोठी आघाडी उघडली आहे. पुन्हा एकदा हिंदूंना आकर्षित करण्यासाठीचे हे पाऊल असल्याची चर्चा सुरू आहे.Shiv Sena Thackeray
या वेळी शिवसैनिकांनी बांगलादेशविरोधात आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तसेच बांगलादेशचा झेंडा पायाखाली तुडवत जाळण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न पोलिसांनी रोखला आणि झेंडा ताब्यात घेतला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसल्याने ठाकरे गटाने पुन्हा हिंदुत्वाची कास धरल्याची चर्चा सुरू झाली आहे.
शहराध्यक्ष संजय मोरे म्हणाले, बांगलादेशची लाडकी बहीण शेख हसीना यांना भारताने स्वीकारले. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराला रोखू शकले नाहीत. रशिया आणि युक्रेनमधील वादात मध्यस्थी करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना शेजारील बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होताना हस्तक्षेप करता येत नाही.
भारतातील हिंदू हे हिंदू समजले जात असतील तर देशाच्या बाहेर राहणारे हिंदूदेखील हिंदू आहेत. त्यामुळे हिंदू धर्माचा सन्मान राखण्यासाठी आणि जगात शांतता टिकवण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणारे अत्याचार रोखले पाहिजेत, अन्यथा शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक होऊन बांगलादेशसोबतचे क्रिकेटचे संबंध तोडेल. पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा करून बांगलादेशला भारताने जगण्याचा अधिकार मिळवून दिल्याचेही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App