प्रतिनिधी
मालवण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीच्या निसर्गरम्य बीचवरचा आपला बेकायदा बंगला जेसीबी लावून तोडला, तर शिवसेनेने त्या गोष्टीची तरफदारी सुरू केली आहे. Shiv sena came in support of CM Uddhav Thackeray’s PA Milind Narvekar
मिलिंद नार्वेकर यांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून हा बंगला बांधला होता. बंगल्याचे बांधकाम सुरू होते. परंतु त्यांना हा बंगला बेकायदा असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःहून तोडला, असा दावा शिवसेनेचे आमदार वैभव परब यांनी केला आहे. बेकायदा बंगला पाडण्याचा चांगला पायंडा मिलिंद नार्वेकर यांनी पाडला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची देखील जुहू येथे 12 मजली बेकायदा बिल्डींग आहे. ते ती बिल्डिंग पाहण्याची हिम्मत दाखवतील का?, असा सवाल वैभव परब यांनी केला आहे.
आमदार वैभव परब यांनी मिलिंद नार्वेकर यांची तरफदारी करताना त्यांनी स्वतःहून बेकायदा बंगला पाडला असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात या बंगल्याच्या बेकायदा बांधकामाविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र पोलिसांना पासून केंद्रीय गृहमंत्रालयाला पर्यंत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर जेसीबी लावून हा बंगला पाडण्यात आला.
त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच स्वतःहून बंगला पाडला या दाव्यात कितपत तथ्य आहे हे तपासावे लागेल. शिवाय नार्वेकर यांच्या बंगल्याच्या निमित्ताने शिवसेनेने नारायण राणे यांच्यावरही राजकीय निशाना साधून घेतल्याचे स्पष्ट होते आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App