CM Fadnavis : मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ची एकनाथ शिंदेंकडून पाहणी; म्हणाले – ‘हा एक तंत्रज्ञानाचा चमत्कार’, 1 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

CM Fadnavis

विशेष प्रतिनिधी

पुणे : CM Fadnavis पुणे प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या बोरघाटातील वाहतूक कोंडी आता कायमची इतिहासजमा होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून हा प्रकल्प तंत्रज्ञानाचा चमत्कार असल्याचे सांगत राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.CM Fadnavis

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे केवळ वेग वाढणार नाही, तर पर्यटनालाही बळ मिळेल. लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. विशेष म्हणजे, बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर या किल्ल्यांच्या आणि लेण्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असून प्रवाशांना ऐतिहासिक वारशाची अनुभूती येईल.CM Fadnavis



‘मिसिंग लिंक’चा विशेष योगायोग

या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ६,७०० कोटी रुपये आहे. २०१९ मध्ये जेव्हा या प्रकल्पाला मंजुरी मिळाली, तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आता त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होत असल्याने हा एक विशेष योगायोग असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. सुरुवातीच्या टप्प्यात या मार्गावरून हलकी वाहने आणि बस वाहतुकीला प्राधान्य दिले जाईल.

राज्यात ‘ऍक्सेस कंट्रोल’ रस्त्यांचे जाळे

महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ ७ ते ८ तासांत पोहोचता यावे, असे सरकारचे लक्ष्य आहे. समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड आणि वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात दळणवळणाची सक्षम व्यवस्था उभारली जात असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये: जगातील सर्वात रुंद बोगदा!

हा प्रकल्प केवळ रस्ता नसून अभियांत्रिकीचा एक चमत्कार मानला जात आहे. या प्रकल्पातील काही खास बाबी.

लांबी: सुमारे १०.५ किलोमीटर.
जगातील विक्रम: सुमारे २३.७५ मीटर रुंदीचा बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक आहे.
अभियांत्रिकी आव्हान: हा रस्ता चक्क लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून जातो.
केबल-स्टेड पूल: टायगर व्हॅलीवर १८२ मीटर उंचीचा भव्य केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे.

Mumbai-Pune Missing Link Inspection: CM Fadnavis to Inaugurate on May 1

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात