Bhima Koregaon Violence Case : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी केंद्राच्या एनआयएकडून तपास सुरू असताना राज्य सरकारने एक आयोग गठीत करून त्यांच्यामार्फत तपास चालवला आहे. राज्य सरकारच्या या आयोगाची मुदत एप्रिल महिन्यात संपली होती, तथापि, मुदतवाढ मिळाल्याने पुन्हा काम सुरू झाले आहे. वृत्तसंस्था एएनआयला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही राज्य सरकारच्या आयोगाकडे साक्ष नोंदवणार आहेत. Sharad Pawar Will Be Summoned By State Inquiry commission To Record Statement on Bhima Koregaon Violence Case
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी केंद्राच्या एनआयएकडून तपास सुरू असताना राज्य सरकारने एक आयोग गठीत करून त्यांच्यामार्फत तपास चालवला आहे. राज्य सरकारच्या या आयोगाची मुदत एप्रिल महिन्यात संपली होती, तथापि, मुदतवाढ मिळाल्याने पुन्हा काम सुरू झाले आहे. वृत्तसंस्था एएनआयला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही राज्य सरकारच्या आयोगाकडे साक्ष नोंदवणार आहेत.
Maharashtra govt-appointed Inquiry commission will record statement of NCP's Sharad Pawar in the Bhima Koregaon violence case. Witnesses' statements to be recorded from August 2 & Pawar will be summoned as well: Ashish Satpute, Inquiry Commission Lawyer — ANI (@ANI) July 9, 2021
Maharashtra govt-appointed Inquiry commission will record statement of NCP's Sharad Pawar in the Bhima Koregaon violence case. Witnesses' statements to be recorded from August 2 & Pawar will be summoned as well: Ashish Satpute, Inquiry Commission Lawyer
— ANI (@ANI) July 9, 2021
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना राज्य चौकशी आयोगाचे वकील आशिष सातपुते म्हणाले की, 2 ऑगस्टपासून कामाला सुरुवात होईल तर यामध्ये एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचीही साक्ष नोंदवली जाणार आहे. लवकरच त्यांना समन्स पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी 2018च्या भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी चुकीच्या पद्धतीने तपास सुरू असल्याचे म्हणत एसआयटी तपासाची मागणी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शरद पवारांनी ही भूमिका घेतली होती.
भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एनआयए ने 8 जणांविरुद्ध तब्बल 10 हजार पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. यात आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी, मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश आहे. नुकताच यातील स्टेन स्वामी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
डिसेंबर 2017 मध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणं देण्यात आली होती. या भाषणांनंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार उसळला. एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला होता.
Sharad Pawar Will Be Summoned By State Inquiry commission To Record Statement on Bhima Koregaon Violence Case
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App