राणेंच्या कर्तृत्वाची उंची शिवसेनेला झेपली नाही ; चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले, की माननीय राणे साहेबांच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे…आणि ती वाढत राहणार आहे. म्हणूनच तर शिवसेनेला ते झेपलं नाही , अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली. Shiv Sena has not surpassed the height of Rane’s deeds

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी राणे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाबाबत भाष्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर वाघ म्हणाल्या, असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूलाही लवकरच मंत्रीपद मिळेल. जेणे करून आपल्यालाही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल.

त्या म्हणाल्या, आपण जे काल स्मृती इराणीबद्दल जे बरळलात…मूळात पहिले तुमचा चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?? ते सांगा. मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे ? याबाबत मी नक्की खुलासा देईन….आपणास एक स्पष्ट सांगायचे आहे की संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा…अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरे ला कारे करण्याची भाषा वापरता येते.

  • राणे यांच्या कर्तृत्वाची उंची शिवसेनेला झेपली नाही
  •  संजय राऊत कधी नव्हे ते खरे बोलले
  • आपल्या बंधूलाही लवकरच मंत्रीपद मिळो
  •  कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य लाभो
  •  स्मृती इराणीबद्दलचे वक्तव्य चुकीचे
  •  महिलांची तुलना करताना भान ठेवा
  •  आरे ला कारे करण्याची भाषा वापरता येते

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात