विशेष प्रतिनिधी
पुणे : शरद पवार हे आजचे शिवाजी महाराज आहेत त्यांचे मावळे होऊन आपण दिल्ली ताब्यात घेऊ, असे वादग्रस्त वक्तव्य मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. खेडेकरांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रभर प्रचंड संताप उसळला असून सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.Sharad Pawar today’s Shivaji; Purushottam Khedekar’s Controversial Statement; Outrage across Maharashtra!!
शरद पवारांच्या समर्थकांनी आज बिगर राजाकीय या नावाखाली “अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब” असा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमामध्ये पुरुषोत्तम खेडेकर, कुमार सप्तर्षी आदी नेत्यांची भाषणे झाली. सगळ्यांनी मिळून मोदी सरकार विरुद्ध गरळ ओकली. मोदींची हुकुमशाही संपवण्याची भाषा सर्व वक्त्यांनी केली.
पण पुरुषोत्तम खेडेकरांनी पवारांच्या स्तुतीची सगळी मर्यादा ओलांडत अक्षरशः कडेलोट केला. आजच्या अस्वस्थ जागतिक तरुणाईचा आश्वासक चेहरा शरद पवार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या काळात अशीच अस्वस्थता होती. जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र अडचणीत आला. हा इतिहास आहे. आजचे शिवाजी पवार साहेब झाले आहेत. आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ. तोपर्यंत तरुणाईची अस्वस्थता थांबणार नाही. आपण आपल्या कृतीतून ही अस्वस्थता थांबवू, असे वादग्रस्त वक्तव्य पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.
पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर संताप उसळला असून शरद पवारांसारख्या विविध पक्ष फोडणाऱ्या नेत्याची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कशी काय तुलना होऊ शकते??, असा संतप्त सवाल अनेक तरुणांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App