नुरा नाही, कुस्ती नाही; पवार बॅकफुट वर, म्हणाले, अजितदादा आमचे!!, त्यामुळे ठाकरे – काँग्रेस गॅसवर!!


प्रतिनिधी

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुरा नाही आणि कुस्तीही नाही, हे आता उघड झाले आहे. अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्याला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत दुजोरा दिला आहे.Sharad pawar on the back foot, accepts ajit pawar as NCP leader

शरद पवार यांनीही अजित पवार हे आमचेच नेते असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्याचा दावा करणाऱ्या अनेकांच्या दावा फोल झाला आहे.



पण या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेस मात्र राजकीय गॅसवर गेले आहेत.

अजित पवार आमचे नेते आहेत, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे?, असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर अजितदादा नेते आहेत. यात वादच नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असे म्हणता येत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांनी देखील बहुसंख्य आमदार आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे लोकशाहीनुसार त्यांचा निर्णय मान्य करून अजित पवार शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा असे वक्तव्य केले होते या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी अजित पवारांना आमचेच नेते म्हणणे हे पवारांनी बॅकफूटवर जाऊन राष्ट्रवादीच्या आमदारांचा निर्णय मान्यवर करण्यासारखे झाले आहे.

अजितदादांच्या सभेचे स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये सभा होणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. लोकशाहीत सभा घ्यायला अडचण नाही. त्याबद्दल चिंता नाही. लोक जाहीर सभा घेऊन भूमिका मांडत असतील तर त्याचा आनंद आहे. त्यामुळे जनतेला कळेल सत्य काय आहे. त्यामुळे कोणीही सभा घेऊन भूमिका मांडत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करतो, असे पवार म्हणाले.

महाविकास आघाडीलाच सर्वाधिक जागा

लोकसभा निवडणुकीचा सर्व्हे आला आहे. त्याता देशात मोदीच येणार असल्याचं म्हटलं आहे. तर राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी सर्व्हे बघितला नाही. त्याचा बेस माहीत नाही. किती लोकांना विचारलं? आणि कोणत्या लोकांना विचारलं? माहीत नाही. मी जी विविध संस्थांकडून माहिती घेत त्यावरून महाविकास आघाडीलाच सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं कळत आहे, असं ते म्हणाले. मात्र, पवार माहिती घेत असलेल्या संस्थांविषयी मात्र त्यांनी काही सांगितले नाही.

सातारा, कोल्हापुरात सभा

शरद पवार आज सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सातारा जिल्ह्यातील दहिवडीत सकाळी पवारांची जाहीर सभा होणार आहे. तर संध्याकाळी कोल्हापूरच्या दसरा चौकात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. शरद पवार उद्या सकाळी 10 वाजता कोल्हापूरात पत्रकार परिषद घेतील.

Sharad pawar on the back foot, accepts ajit pawar as NCP leader

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात