महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह सात राज्यांना झायडस कॅडिलाची जायकोव्ह-डी लस मिळणार ; सध्या प्राधान्याने प्रौढ नागरिकांना लस देणार


  • दरम्यान ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार लसीकरणाला गती देत आहे. Seven states, including Maharashtra and Uttar Pradesh, will receive the Zykov-D vaccine for Zydus Cadila

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असताना आता कोरोनाचा नवा ओमायक्रोन व्हेरिएंट नवीन संकट वाढवताना दिसून येत आहे.हा विषाणू अवघ्या आठ दिवसात दक्षिण आफ्रिकेतून तब्बल २३ देशांमध्ये पसरला आहे.दरम्यान ओमायक्रोन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकार लसीकरणाला गती देत आहे.

याच अनुषंगाने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह सात राज्यांना झायडस कॅडिलाची जायकोव्ह-डी लस देण्यात येणार आहे.अजूनपर्यंत लसीचा एकही डोस न घेतलेल्या प्रौढांना ही लस देण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, पंजाब, तामीळनाडू या सात राज्यांना ही लस दिली जाणार आहे.जायकोव्ह-डी तीन डोसची लस असून ‘सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड पंट्रोल ऑर्गनायझेशन’ने अलीकडेच 12 वर्षे व त्यापुढील मुलांसाठी या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी दिली होती. मात्र या लसीचा सध्या प्राधान्याने सात राज्यांतील प्रौढ नागरिकांसाठी वापर केला जाणार आहे.

Seven states, including Maharashtra and Uttar Pradesh, will receive the Zykov-D vaccine for Zydus Cadila

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात