GREAT GADKARI : आऊट ऑफ बॉक्स संकल्पना ! शहरांमधील सांडपाणी- घनकचरा वापरून तयार होणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर चालणार बस-ट्रक-कार


  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पथदर्शी प्रकल्पासाठी फरीदाबादच्या तेल संशोधन संस्थेत उत्पादित ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी केली आहे. 
  • आर्थिक समावेशावरील राष्ट्रीय शिखर परिषदेला संबोधित करताना गडकरी म्हणाले की ते ही कार दिल्लीत चालवतील जेणेकरून लोकांना विश्वास वाटेल की पाण्यातून ग्रीन हायड्रोजन मिळणे शक्य आहे.
  • शहरांमधील सांडपाणी आणि घनकचरा वापरून तयार होणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर बस, ट्रक आणि कार चालवण्याची योजना.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रीन हायड्रोजनवर बसेस, ट्रक आणि कार चालवण्याची योजना असल्याचे त्यांनी नॅशनल समिट ऑन फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये स्पष्ट केले. सांडपाणी आणि घनकचऱ्यापासून (Solid Waste) ग्रीन हायड्रोजनची निर्मिती करता येईल, असं गडकरी म्हणाले. ऑईल रिसर्च इन्स्टिट्यूट, फरिदाबाद यांच्याकडून ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार बनवण्यात आली असून ती विकत घेतली असल्याची त्यांनी सांगितले. GREAT GADKARI: Out of the box concept! Urban Sewage – Bus-Truck-Car to run on Green Hydrogen made using solid waste

ग्रीन हायड्रोजन कार दिल्लीत चालवणार …

नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीमध्ये ग्रीन हायड्रोजनवर चालणारी कार चालवणार असल्याचं म्हटलं.

या कार्यक्रमात त्यांनी ग्रीन हायड्रोजनसंदर्भात मार्गदर्शन केलं.

सांडपाणी विकून नागपूरला 325 कोटी मिळतात

नितीन गडकरींच्या पुढाकारानं नागपूरमधील 7 वर्षांपासून सुरु असलेल्या प्रकल्पाबद्दल गडकरींनी सांगितलं. नागपूरमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्र सरकारच्या वीज प्रकल्पाला सांडपाणी विकून नागपूरला 325 कोटी रुपये मिळतात. कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते. नेतृत्त्वाकडं असणाऱ्या दूरदृष्टीवर सगळं अवलंबून असतं. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तुम्ही कचऱ्यातून आर्थिक कमाई करु शकता, असंही ते म्हणाले. आता आपल्याला वाया जाणाऱ्या पाण्यातून आणि सांडपाण्यातून आर्थिक कमाई करता येते का हे पाहायचं आहे. प्रत्येक नगरपालिकेकडे अशा प्रकारचं पाणी उपलब्ध असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. आऊट ऑफ बॉक्स जाणाऱ्या संकल्पना स्वीकारायला लोक लवकर तयार होत नाहीत, असं नितीन गडकरी म्हणाले.

GREAT GADKARI : Out of the box concept! Urban Sewage – Bus-Truck-Car to run on Green Hydrogen made using solid waste

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात