ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांचे पहाटे तीन वाजता निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि कोरोना झाला होता. डेंग्यू बरा झाला, मात्र लंग्ज इन्फेक्शन ८० टक्के होते. Senior Journalist Dinkar Raykar no more

नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. गुरुवारी रात्री त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र पहाटे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला.


‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचं कोल्हापुरात निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


एक हसतमुख, मनमिळावू, दिलदार पत्रकार म्हणून ते ओळखले जात. ते मुळचे कोल्हापूर येथील होते. बातमीदार ते समूह संपादक असा त्यांचा यशाचा दीर्घ प्रवास होता. सुमारे ५० वर्षे त्यांनी पत्रकारितेत स्वतः चा ठसा उमटवला. मुंबईत अनेक नामवंत वर्तमान पत्रात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. नागपूर विद्यापीठाच्या हिस्लॉप महाविद्यालयातून कला शाखेत पदवी प्राप्त केली होती.

त्यांनी एक्सप्रेस समूहात काम केले आहे. रायकर २००२ मध्ये लोकमत समूहात रुजू झाले.

Senior Journalist Dinkar Raykar no more

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात