विशेष प्रतिनिधी
मुंबई : पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु करण्यास टास्क फोर्सने नकार दिला आहे.लहान मुलांसाठी अद्याप देखील वातावरण अनुकूल नाही. लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू करणं योग्य होणार नाही, असं मत टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केलंय. शिक्षण विभाग पहिली ते पाचवीच्या शाळा सुरू करण्यास अनुकूल असलं तरी टास्क फोर्सनं मात्र विरोध केलाय. Schools Reopen: third wave ? Whats the opinin of task force about opening of pre school?
मुलं कोविडला बळी पडणार नाहीत याची काळजी अधिक असल्याचं डॉ. ओक यांनी सांगितलं.लसीकरण झालेली मुलं शाळेत यायला हवीत. केंद्र सरकरने आता लवकरात लवकर लहान मुलांचं लसीकरण सुरू करावं, असं मत डॉ. ओक यांनी व्यक्त केलं. मास्क ही पहिली लस आहे. मात्र सणासुदीच्या दिवसात लोकांनी मास्क टाळला. यामुळेच तिसरी लाट येणार नाही असं म्हणता येत नाही.
अमेरिकेत मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण इतकं वाढले की मुलांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट केले जात आहे. ही परिस्थिती मला माझ्या राज्यात येऊ द्यायची नाही, असेही टास्क फोर्सने स्पष्ट केले. मुंबईत लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिबॉडिज आढळले आहेत. जी परिस्थिती एप्रिल 2021 होती. आता टीव्हायरल औषध आहेत, मोनोक्लोमल अँटीबॉडीज आहेत. भारताने सगळ्यात आधी डेल्टा व्हेरिएंटचा सामना केला. मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो नाही, पण त्यांच्या डॉक्टरांशी बोललो. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना 30 नोव्हेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याची मुदत राज्य सरकारने दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App