पुलवामा हल्यासाठी दहशतवाद्यांनी अ‍ॅमेझॉनवरून रासायनिक पदार्थ मागविले, कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सचा आरोप्


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पुलवामा हल्यासाठी दहशतवाद्यांनी अमेझॉनवरून रासायनिक पदार्थ मागवल्याचा आरोप कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने केला आहे. कंपनीकडून वारंवार नियमांची आणि देशाच्या सुरक्षा निकषांची पायमल्ली केली जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते.Terrorists solicit chemicals from Amazon for Pulwama attack, Confederation of India Traders alleges

कॉन्फडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्सने म्हटले आहे की, गांजा आणि मारिजुआना यासारखे पदार्थ यापूवीर्देखील अमेझॉनवरून विकण्यात आल्याचं सिद्ध झालं आहे. त्याबद्दल पूवीर्देखील कंपनीवर टीका झाली होती. मात्र आता हे प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे कंपनीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.



जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये २०१९ साली झालेल्या दहशतवादी हल्यात ४० सीआरपीएफ जवानांचा बळी गेला होता. राष्ट्रीय तपास संस्थेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या हल्यासाठी जी रसायनं दहशतवाद्यांनी वापरली, त्याची डिलिव्हरी अमेझॉन कंपनीकडून करण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेला अमेझॉनकडून याचे तपशील सादर करण्यात आले आहेत. विशेषत: भारतात बंदी असलेल्या अमोनियम नायट्रेटची डिलिव्हरीदेखील अमेझॉनवरून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतात बंदी असणारे पदार्थ अमेझॉनवरून कसे काय पुरवले जाऊ शकतात, असा आक्षेप उपस्थित करत कॅटनं कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवण्यासाठी अमेझॉनवरून आयईडी, बॅटरी आणि इतर साहित्याची खरेदी केली होती. त्याचबरोबर अमोनियम नायट्रेट आणि नायट्रोग्लिसरीन यांचाही पुरवठा करण्यात आला होता. याच्या आधारेच बॉम्ब बनवण्यात आला होता, असं तपासातून स्पष्ट झालं आहे.

आपल्या देशातील जवानांचा जीव घेण्यासाठी कारणीभूत ठरलेले आणि देशात बंदी असलेले पदार्थ अमेझॉननं पुरवल्याचं पुराव्यानिशी सिद्ध होत असल्यामुळे कंपनीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कॉन्फडरेशन ऑफ ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी केली आहे.

Terrorists solicit chemicals from Amazon for Pulwama attack, Confederation of India Traders alleges

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात