झंडा ऊंचा रहे हमारा, १५ हजार फूट उंचीवर ७६ फूट उंचीचा तिरंगा फडकला


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: लडाखमध्ये भारतावर डोळे वटारत असलेल्या चीनला भारतीय लष्कराने सूचक इशारा दिला आहे. भारतीय लष्कराने लडाखमध्ये १५,000 फूट उंचीवर ७६ फूट उंच ध्वज फडकावला.भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने हणले खोऱ्यात हा ध्वज फडकावण्यात आला. लष्कराने त्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.Our flag remained high, a tricolor of 76 feet high was hoisted at a height of 15,000 feet

हा ध्वज भारतीय लष्कर आणि फ्लॅग फाऊंडेशन ऑफ इंडियाने तयार केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हा ध्वज फडकावण्यात आल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. व्हिडीओमध्ये राष्ट्रगीत वाजत असतानाच जवानांचे दोन गट ध्वजाला सलामी देताना दिसत आहेत.



दुसरीकडे भारतीय लष्कराच्या या हालचालीकडे शत्रू एक कडक मेसेज म्हणूनही पाहत आहेत. यापूर्वी 2 ऑक्टोबरला लेहमध्ये जगातील सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला होता. हा ध्वज 225 फूट लांब आणि 150 फूट रुंद होता. श्रीनगरमधील संरक्षण जनसंपर्क अधिकारी कर्नल इम्रॉन मौसावी यांनी सांगितले की,

फायर अँड फ्युरी कॉर्प्सने लेह गॅरिसनमध्ये एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जिथे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांनी उंच पर्वतावर एक मोठा राष्ट्रध्वज फडकावला होता. चीफ जनरल एम एम नरवणे आणि नॉर्दर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल वायके जोशी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराने गेल्या काही महिन्यांत लडाखमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेय. या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने 7 नोव्हेंबर 1947 रोजी शालतेंगच्या लढाईत काश्मिरी आणि भारतीय सैनिकांनी केलेल्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी ऐतिहासिक शाल्टेंगची लढाई पुन्हा साकारण्यासाठी लाईट आणि साऊंड शो आयोजित केला होता.

Our flag remained high, a tricolor of 76 feet high was hoisted at a height of 15,000 feet

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात