प्रदूषणामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला सामोरे जावे लागते, नागरिकांनी प्रदूषणविरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे -पालकमंत्री छगन भुजबळ


काल (ता.२१)भुजबळ फार्म येथील कार्यालयात ‘गो ग्रीन कॅब सर्व्हिसेस’चा प्रारंभ श्री. भुजबळ आणि महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. Pollution has to deal with ‘global warming’, citizens should prefer to use pollution free vehicles: Guardian Minister Chhagan Bhujbal


विशेष प्रतिनिधी

नाशिक : सगळ्यात जास्त वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होते.वाहनांच्या वाढत्या प्रदूषणामुळे ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला तोंड द्यावं लागतं आहे. याच्यापासून संरक्षण करण्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे प्रदूषणविरहित वाहनांचा वापर करणे.

काल (ता.२१)भुजबळ फार्म येथील कार्यालयात ‘गो ग्रीन कॅब सर्व्हिसेस’चा प्रारंभ श्री. भुजबळ आणि महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाला.यावेळी श्री. भुजबळ म्हणाले की ,’ग्लोबल वॉर्मिंग’पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अधिक प्रदूषणविरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे.”

पुढे भुजबळ म्हणाले की , नाशिकमध्ये पहिल्यांदाच ‘गो ग्रीन’ उपक्रम सुरू होत असून हा उपक्रम चांगला आहे. नाशिक शहर अधिक स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त कसे राहील, यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे सांगितले.नाशिकची दिल्ली होऊ नये म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. पर्यावरणपूरक वाहने वापरण्यास नाशिक महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.अस देखील भुजबळ म्हणाले.



भुजबळ म्हणाले ‘गो ग्रीन’ ही संकल्पना हीना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या या तीन महिला इलेक्ट्रिक कॅब्सच्या माध्यमातून राबवीत आहेत. नाशिककरांना पर्यावरणापूरक आणि निसर्गाशी जोडणारी सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.तसेच नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘गो ग्रीन’तर्फे प्रतिनिधींना जाण्यासाठी मोफत प्रवासाची सोय केली आहे.

‘गो ग्रीन कॅब सर्व्हिसेस’च्या प्रारंभवेळी माजी आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, साहित्य संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक जगदीश पवार, श्रमिक शहा, मोहित भाटिया, अनुप मढय्या आदी उपस्थित होते.

Pollution has to deal with ‘global warming’, citizens should prefer to use pollution free vehicles: Guardian Minister Chhagan Bhujbal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात