गोदामाई दिसते कशी?; चित्रकला स्पर्धा सुरू गोदावरी काठी चित्रकला बहरली

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकच्या गोदावरी किनारी अनोखी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा रंगली.राज्यभरातून चित्रकार या स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेच खास वैशिष्ट्य म्हणजे चित्रकारांच्या नजरेत गोदावरी कशी दिसते, ते गोदावरी किनारी बसूनच चित्रकार गोदामाईच सुंदर रूप रेखाटत आहेत. २१ ते २४ नोव्हेंबर या दरम्यान ही स्पर्धा सुरू असणार आहे.आज पहिल्याच दिवशी राज्यभरातील चित्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २७ ते २८ नोव्हेंबर दोन दिवस या सर्व चित्रांच प्रदर्शन असणार आहे.

– गोदामाई दिसते कशी?; चित्रकला स्पर्धा सुरू

 गोदाकाठी चित्रकार एकवटले

– राज्यभरातून चित्रकार स्पर्धेत सहभागी

– चित्रकार गोदामाईच सुंदर रूप रेखाटत आहेत

– २७ ते २८ नोव्हेंबर रोजी या सर्व चित्रांच प्रदर्शन

What does godavari look like ?;Painting competition begins