रोहित पवारांनी बारामती ऍग्रो वरील ED छाप्यांचा संबंध जोडला अजितदादा मित्रमंडळाशी!!

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळ्यात शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीच्या कार्यालयावर एकाचवेळी ED ने छापे घातले. या छाप्यांमुळे रोहित पवारांना परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. भारतात परतल्यावर त्यांनी या छाप्यांचा संबंध अजितदादा मित्रमंडळाशी जोडला.Rohit Pawar links ED raids on Baramati Agro to Ajit Dada alliance

ED ने या छापेमारीत अनेक महत्त्वाची कागदपत्र जप्त केली. रोहित पवार परदेशात असतानाच ही छापेमारी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. छापेमारीची माहिती मिळाल्यानंतर रोहित पवार परदेशातील दौरा अर्धवट सोडून तातडीने कालच पुण्यात आले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. तसेच या छापेमारी मागचं कनेक्शन अजितदादांच्या मित्रमंडळाशी जोडले.



रोहित पवार म्हणाले

गेल्या 7 दिवसांत दिल्लीत कोण गेले होते?? त्यामध्ये भाजप आणि अजितदादा मित्रमंडळाचे कोण होते?? त्यावरून या छापेमारी मागच्या काही गोष्टी समजून येतील. पण या विषयावर आत्ताच मी अधिक बोलणार नाही. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग काही नाही. कारवाई सुरू आहे. आम्ही सर्व कागदपत्र दिली आहेत.

सत्तेवर असलेले नेते मोठ्या आवाजात बोलत आहेत. मी चूक केली असती, तर मी परदेशातून आलो नसतो. नाही तर अजितदादांबरोबर भाजपात जाऊन बसलो असतो. पण आमच्यासाठी विचार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राची अस्मिता महत्त्वाची आहे. आमचा लढा सुरू आहे. ED असो किंवा कोणताही विभाग असो, आम्ही त्यांना मदत करत राहू.

– हे लोक ज्याला घोटाळा म्हणत आहेत. तो कधी झाला? बँकेवर प्रशासक कधी होते?? प्रशासक असताना कोणत्या कंपन्या विकल्या गेल्या?? राजकीय नेते तिथे होते. ज्यांच्यावर कारवाई सुरू होती, त्यांची यादी मागितली होती. त्या यादीत कुणाकुणाची नावे होती. ती माणसं त्याच पक्षात आहे की भाजपमध्ये गेले, याचा अभ्यास करा. तुमच्या लक्षात येईल. हे सर्व असताना तुम्ही एकालाच का टार्गेट करताय, हे सिद्ध होईल.

Rohit Pawar links ED raids on Baramati Agro to Ajit Dada alliance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात