बारामती- पुणे रेल्वेसेवा पुन्हा सुरु करा , प्रवाशांची मागणी


कोरोनाच्या संकटामुळे बंद केलेली ही सेवा दोन वर्षे झाली तरी पुन्हा पूर्ववत झालेली नाही, त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होते आहे.Resumption of Baramati-Pune railway service, demand of passengers


विशेष प्रतिनिधी

बारामती : एसटीच्या तुलनेत स्वस्त प्रवासाचे साधन म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते.तसेच वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अवघ्या तीस रुपयात पुण्यापर्यंतचा प्रवास सहज शक्य होतो.दरम्यान कोरोना संसर्गामुळे बंद असलेली बारामती- दौंड- पुणे ही रेल्वेसेवा पुन्हा सुरु करण्याची प्रवाशांची मागणी आहे .

कोरोनाच्या संकटामुळे बंद केलेली ही सेवा दोन वर्षे झाली तरी पुन्हा पूर्ववत झालेली नाही, त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होते आहे.दरम्यान रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.बारामतीहून दररोज सकाळी सात, सकाळी पावणेअकरा, दुपारी सव्वाचार व रात्री सव्वा दहा वाजता पॅसेंजर रेल्वे दौंडला जाते.



सर्व जनजीवन सुरळीत सुरु झालेले असताना रेल्वेसेवा पूर्ववत का केली जात नाही, असा लोकांचा प्रश्न आहे. रेल्वेचा तीनही पॅसेंजर पुण्यापर्यंत धावतात त्यामुळे प्रवाशांची सोय होते. बारामती ते दौंड या अंतरासाठी दहा रुपये लागतात तर बारामती ते पुणे या अंतरासाठी तीस रुपये तिकिटाचा दर असल्याने स्वस्त पर्याय म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते.

Resumption of Baramati-Pune railway service, demand of passengers

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात