Param Bir Singh : परमबीर सिंह यांच्या अटकेस स्थगिती ; ते भारतातच; त्यांच्या जीवाला मुंबईत धोका म्हणून महाराष्ट्राबाहेर


  • सर्वोच्च न्यायालयाने सध्या परमबीर सिंह यांच्या अटकेला स्थगिती दिली असून त्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. 

  • परमबीर सिंह नेपाळमार्गे देश सोडून गेल्याची माहिती चुकीची

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या अटकेला तूर्तास स्थगिती दिली असून तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. त्यांना अटक होणार नाही, मात्र त्यांनी सीबीआयसमोर हजर राहून तपासात सहकार्य करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.  Relief to Parambir: Former Commissioner of Police of Mumbai is in the country, Supreme Court said- there will be no arrest, cooperate in investigation

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह देश सोडून पळून गेले असल्याचं वृत्त खोटं असल्याच आता समोर आलं आहे.परमबीर सिंह यांच्या वकिलांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. पुढील ४८ तासात कोणत्याही सीबीआय किंवा इतर कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केलाय.

परमबीर सिंह हे भारतातच असून, मुंबईत त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते महाराष्ट्राबाहेर असल्याची माहिती वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुलीचा आरोप करणारे आणि सध्या गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली.

मागील सुनावणी वेळी न्यायालयाने परमबीर सिंह कुठे आहेत, असा सवाल करत त्यांचा ठिकाणा विचारला होता. त्यावर वकिलांनी ते भारतातच असल्याचं उत्तर दिलं आहे.

Relief to Parambir : Former Commissioner of Police of Mumbai is in the country, Supreme Court said- there will be no arrest, cooperate in investigation

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात