विशेष प्रतिनिधी
सोलापूर : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हातात तुतारी घेतल्याबरोबर धैर्यशील मोहिते पाटलांची भाषा बदलली. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते याचे पार्सल एका रात्रीत बीडला पाठवू. तेवढी आमच्यात धमक आहे, अशी धमकीभरली भाषा धैर्यशील मोहिते पाटलांनी वापरली. राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना तितक्याच तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले. Ram Satput’s reply to Mohite Patil
विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तुतारी चिन्हावर माढा लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यावेळी घेतलेल्या मेळाव्यात धैर्यशील मोहिते पाटलांनी आमदार राम सातपुते यांच्या बद्दल एकेरी भाषा वापरली. विजय दादांच्या सांगण्यावरून तुला एका रात्रीत आमदार केला होता, पण आता तुझे पार्सल एका रात्रीत बीडला परत पाठवण्याची आमच्यात धमक आहे, अशी धमकी धैर्यशील मोहिते पाटलांनी दिली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
धैर्यशील मोहिते पाटलांच्या या धमकीला राम सातपुते यांनी तितक्याच तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले. माझे आई-वडील ऊसतोड कामगार होते. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक साखर कारखान्यावर घाम आणि रक्त गाळले. एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला भाजपने उमेदवारी दिली आहे. मला बड्या घरातल्या कोणी धमकी दिली. माझे पार्सल बीडला पाठवण्याची भाषा केली, तरी प्रत्यक्षात सोलापूरची जनता माझे पार्सल दिल्लीलाच पाठवेल. सोलापूरच्या जनतेचे प्रश्न मी लोकसभेत मांडून सोलापूरच्या युवकांच्या हाताला काम देईन, असे प्रत्युत्तर राम सातपुते यांनी दिले.
राम सातपुते यांच्या उत्तराचा व्हिडिओ देखील सगळीकडे व्हायरल झाला आहे. त्यामुळे माढा आणि सोलापूरची लढत आता प्रस्थापित विरुद्ध गरीब अशी बदलली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App