Rahul Shewale : राहुल शेवाळे यांचा दावा : 23 जानेवारीला केंद्रासह राज्यात राजकीय भूकंप होणार; ठाकरे गटाचे 15, काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात

Rahul Shewale

प्रतिनिधी

मुंबई : Rahul Shewale आगामी 23 तारखेला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. ठाकरे गटाचे 15 व काँग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे 23 जानेवारी रोजी राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी केंद्रातही मोठा भूकंप होणार असल्याचा दावा केला.Rahul Shewale

राहुल शेवाले सोमवारी म्हणाले की, 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे गटाचे 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. याशिवाय काँग्रेसचेही 10 आमदार आमच्या संपर्कात आहेत. या प्रकरणी केंद्रातही राजकीय भूकंप होऊ शकतो. गेल्या कित्येक दिवसांपासून यासंबंधीच्या घडामोडी सुरू आहेत. याची कुठे ना कुठे तरी चाहूल लागल्यामुळे विजय वडेट्टीवार व संजय राऊत हे स्वतःचा अस्त वाचवण्यासाठी शिवसेनेवर एकनाथ शिंदे व उदय सामंत यांच्यात मतभेद असल्याचे बिनबुडाचे आरोप करत आहेत.



उल्लेखनीय बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी मुंबई दक्षिण – मध्य लोकसभा मतदारसंघातून मानहाणीकारक पराभव केला होता. त्यांच्या पराभवाने शिंदे गटाला जबर झटका बसला होता. तेव्हापासून राहुल शेवाळे काहीसे बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. पण आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत.

विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्ला

दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांनी भाजप एकनाथ शिंदे यांना संपवून उदय सामंत यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. एकनाथ शिंदे सध्या महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. आपली नाराजी दाखवून ते आपल्या पदरात काहीतरी पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण, सध्या एकनाथ शिंदे यांची राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आज त्यांची गरज संपल्याचे चित्र आहे. त्यामुळे ते स्वतःहून बाजूला व्हावेत अशी स्थिती निर्माण केली जात आहे. भाजपने उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना आणले. आता एकनाथ शिंदे यांना संपवून नवीन उदय पुढे येईल, असे ते मंत्री उदय सामंत यांच्याकडे अंगुलीनिर्देश करताना म्हणाले होते.

Rahul Shewale claims: There will be a political earthquake in the state including the Centre on January 23

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात