पटोले समर्थकांना बढती?; म्हणून सचिन सावंत यांचा काँग्रेस प्रवक्तेपदाचा राजीनामा?


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील काँग्रेस पदाधिका-यांच्या नव्याने नियुक्त्या केल्या आहेत. यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या नाराजीतून आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पक्षाच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.Promoting Patole supporter Sachin Sawant resigns as Congress spokesperson?

अतुल लोंढे यांना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते पद दिल्याने सचिन सावंत यांनी नाराज होऊन आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. गेल्या 10 वर्षांपासून सचिन सावंत यांनी काँग्रेसचे प्रवक्तेपद भूषविले आहे. आपल्या आक्रमक शैलीने सावंत यांनी कायम विरोधी पक्षांवर टीका केली आहे.



महाविकास सरकार सत्तेत आल्यावर देखील त्यांनी भाजपा नेत्यांना नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यांना विधान परिषदेवर देखील पाठवणार असल्याची चर्चा काही काळ रंगली होती.पण मंगळवारी झालेल्या राज्यातील काँग्रेस पदाधिका-यांच्या नियुक्त्यांमध्ये सचिन सावंत यांना डावलण्यात आल्यामुळे, त्यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.

नव्या नियुक्त्यांमध्ये नाना पटोले यांच्याच समर्थकांची वर्णी लागल्याचे बोलले जात आहे. अतुल लोंढे हे कट्टर पटोले समर्थक असल्यानेच त्यांची काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

Promoting Patole supporter Sachin Sawant resigns as Congress spokesperson?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात