चंद्रपूर येथील राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसची अध्यक्ष चक्क वाहनचोर निघाली आहे. साथीदारांच्या मदतीने वाहनचोरीचा उद्योग तिने सुरू केला होता. तिच्या साथीदारांना मोपेड चोरीचा प्रकरणात अटक झाली आहे.President of NCP Yuvati Congress vehicle thief
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूर येथील राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसची अध्यक्ष चक्क वाहनचोर निघाली आहे. साथीदारांच्या मदतीने वाहनचोरीचा उद्योग तिने सुरू केला होता. तिच्या साथीदारांना मोपेड चोरीचा प्रकरणात अटक झाली आहे.
NCP’s Temple Run; राष्ट्रवादीचे मंत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवाच्या द्वारी; यातून काय मेसेज जातोय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती प्रमुख असलेल्या तरुणीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.वैष्णवी देवतळे असे या युवती प्रमुख कार्यकतीर्चे नाव आहे. आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ती वाहनचोरी करत असल्याचे उघड झाले आहे.
तिचे दोन साथीदार विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती. एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेले वाहन सोडून जाणाऱ्या वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे. नेमकी संधी साधून मोपेड चोरी करत होते. त्यानंतर त्या मोपेडला दूरवर पर्यंत ढकलत नेण्यात येत होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App