NCP’s Temple Run; राष्ट्रवादीचे मंत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवाच्या द्वारी; यातून काय मेसेज जातोय?


नाशिक : शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी देवाच्या द्वारी जाणे पसंत केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन आरती केली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन प्रार्थना केली. यातून राष्ट्रवादीचे नेते नेमका काय संदेश देऊ इच्छितात?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात सकाळपासून चर्चेला आला आहे.NCP’s temple Darshan Indicate its willingness to over ride Shiv Sena

एरवी शिवसेना आणि भाजपचे नेते मंदिरांमध्ये जाण्यात आघाडीवर असतात. या वेळेला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांनी ठरवून मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले आहे. गेले सुमारे वर्ष दीड वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे धार्मिक स्थळे बंद होती. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने ती नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज ७ ऑक्टोबरला उघडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली.



यामध्ये कोविड प्रोटोकॉल पाळण्यात संदर्भातली नियमावली देखील सरकारने जारी केली आहे. पण हे सर्व सामान्य जनतेसाठी करत असताना पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्यांनी देवाच्या द्वारी जाऊन नेमका कोणता राजकीय संदेश दिला आहे, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मंदिरांमध्ये प्रार्थना करताना दिसत आहेत. बीडमध्ये परळी वैजनाथ मंदिराचे दरवाजे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी भाविकांसाठी उघडले. परळी वैजनाथची पूजा-अर्चा त्यांनी केली. यातून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आपली प्रतिमा सुधारुन तसेच महा विकास आघाडी तुला घटक पक्ष शिवसेना याच्यावर राजकीयदृष्ट्या कुरघोडी केल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण शिवसेनेचे मंत्री एरवी मंदिर प्रवेश किंवा मंदिराच्या संदर्भातल्या कोणत्याही गोष्टी करण्यात आघाडीवर असतात. या वेळेला मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी ठरवून एकेका मंदिरात जाऊन आपली हिंदूंची जवळीक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे असे मानले जात आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक फटका शिवसेनेला बसल्याचे आकडेवारी सांगते. भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. ते यश आणि आगामी महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर भाजपला मागे टाकता आले नाही तरी शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी राष्ट्रवादीचे नेते टप्प्याटप्प्याने घेत असल्याचे दिसून येत आहे.

ऐन नवरात्रात 11 ऑक्टोबरला पुकारलेला महाराष्ट्र बंद हा देखील याच राजकारणाचा एक भाग दिसून येत आहे. शिवसेनेने पुकारलेले बंद कायम यशस्वी झाले. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेसने पुकारलेल्या बंदचा फज्जा उडालेला दिसला आहे. ११ तारखेच्या बंदच्या वेळी शिवसैनिक रस्त्यावर उतरून बंद करतील आणि त्याचे श्रेय राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर सहभागी होऊन आपल्याकडे ओढून घेतील, असे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची आजची “टेम्पल रन” त्याचीच एक चुणूक आहे.

NCP’s temple Darshan Indicate its willingness to over ride Shiv Sena

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात