राष्ट्रवादीचे “गरज असेल तिथे आघाडी” आणि “गरज नसेल तिथे बिघाडी” धोरण… शिवसेनेसाठी सावध ऐका पुढल्या हाका!!


महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला “गरज असेल तिथे आघाडी” हे उघडपणे आणि राष्ट्रवादीला “गरज नसेल तिथे बिघाडी” हे शरद पवारांचे जुने धोरण राबवायचा राष्ट्रवादीचा मनसूबा आहे. नबाब मलिक यांच्या तोंडून त्यातला अर्धा भाग कालच्या पत्रकार परिषदेत उघड झाला आहे. त्यातला “इशारा” शिवसेनेच्या नेतृत्वाने डोळे उघडून नीट वाचण्याची गरज आहे. NCP`s election strategy to curtail shiv sena in mumbai and in rest of maharashtra by demolishing alliance prospects at core level


विनायक ढेरे

“हे शिवसेनेसाठी हे शिवसेनेसाठी आहे… सावध ऐका पुढल्या हाका!!”, हे म्हणायची वेळ का आली…?? हे म्हणायची वेळ येण्याचे कारण काल सायंकाळी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत दडले आहे… किंबहुना “दडले” आहे असे म्हणण्यापेक्षा “उघड” झाले आहे, असे म्हणणे उचित ठरेल.

ही बैठक दुसऱ्या – तिसऱ्या कोणी नव्हे, तर दस्तुरखुद्द शरद पवारांनी घेतली. ती देखील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक होती. काय ठरले त्या बैठकीत??, त्या बैठकीत असे ठरले की “गरज असेल तिथे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची”, हे सांगितले गेले…!! पण जे उघडपणे सांगितले गेले नाही ते म्हणजे “गरज नसेल तिथे बिघाडी करायची…!!” आणि हे खरे राष्ट्रवादीचे धोरण आहे. हेच शिवसेनेसाठी सावध ऐका पुढल्या हाका… असे म्हणायचे कारण आहे.

पुढील वर्षांत मुंबईसह २३ शहरांच्या महापालिका, अनेक नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या तयारीबाबत तसेच कुठे मित्र पक्षांशी आघाडी करायची, कुठे स्बळावर लढता येईल हे पाहायचे याबाबत पवारांनी घेतलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीच्या प्रत्येक मंत्र्याकडे एकेका जिल्ह्य़ाची जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीची ही फेरबांधणी करण्याची मशक्कत आहे.

नारायण राणे यांच्या निमित्ताने शिवसेना – भाजप यांच्यातील भांडण निकराला आलेले असताना राष्ट्रवादीची ही फेरबांधणी सुरू आहे आणि ती शिवसेनेच्या संघटनेच्या मूळावर येणारी आहे. कालच्या बैठकीतल्या गरज असेल तिथे आघाडी…, या निर्णयाचे हे सार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणि मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आधीच काँग्रेसच्या स्वबळाची उघड घोषणा केली आहे, पण कालच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्वबळाची उघड घोषणा न करता, “गरज असेल तिथे आघाडी करायची”, अशी उघड भाषा वापरत उघड भाषा वापरत राष्ट्रवादीला “गरज नसेल तिथे छुपेपणाने बिघाडी” करायची असा निर्णय घेण्यात आला आहे आणि नेमका हाच शिवसेनेसाठी इशारा आहे. मुंबईत शिवसेनेबरोबर काँग्रेस येणार नाही कारण काँग्रेसचा तिथे पाया मजबूत आहे. शिवसेनेबरोबर टक्कर घेताना काँग्रेसने अनेकदा मुंबईत सहा खासदार निवडून आणले आहेत. राष्ट्रवादीला तिथे काहीही स्थान नाही. अशावेळी काँग्रेसने स्वबळाची भाषा करणे समजू शकते पण राष्ट्रवादी सारखा पक्ष जेव्हा गरज असेल तिथे आघाडी अशी उघड भाषा वापरून गरज नसेल तिथे बिघाडी असा छुपा करेक्ट कार्यक्रम जेव्हा राबवतो तेव्हा तो शिवसेनेसारख्या पक्षालाच इशारा असतो आणि नेमका हाच इशारा समजून घेण्याची गरज आहे.



आज राष्ट्रवादीला गरज आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपपासून फोडून मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे. जेव्हा ही गरज संपेल तेव्हा “गरज सरो वैद्य मरो”, या म्हणीप्रमाणे ते बाजूला होतील. त्यातूनच राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी गरज असेल तिथे राष्ट्रवादी आघाडी करेल अशी भाषा वापरून गरज नसेल तिथे बिघाडी करेल असेच सूचित केले आहे. याचा नेमका अर्थ इतर कोणी विश्लेषकांनी नव्हे तर शिवसेनेच्या निर्णयकर्त्या नेत्यांनी समजून घेतला पाहिजे.

कारण मुंबई आणि कोकणात नारायण राणे यांच्याशी उघड पंगा घेऊन बातम्यांचे ढोल-नगारे वाजवणाऱ्या शिवसेनेची संघटनात्मक पातळीवर कशी “सुमडीत कोंबडी” कापली जाते आहे याची उदाहरणे महाराष्ट्रात इतरत्र याच काळात ठळक दिसली आहेत. जयंत पाटलांनी उघडपणे शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. खानापूर आटपाडीचे शिवसेना आमदार अनिल बाबर यांना जयंत पाटलांनी खुली ऑफर दिली आहे. कोकणातल्या खेड पंचायतीत राष्ट्रवादीने उघडपणे सदस्य फोडून शिवसेनेकडून सत्ता बळकावली आहे. राष्ट्रवादीची ही संघटनात्मक पातळीवरची बांधणी छुपेपणाने नव्हे, तर उघडपणे सुरू आहे आणि ती भाजप किंवा काँग्रेस फोडुन नव्हे तर सध्या तरी शिवसेना फोडून सुरू आहे. हा प्रयोग नवी मुंबईत नजीकच्या काळात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ठाण्यात छोट्या प्रमाणात राष्ट्रवादी हाच प्रयत्न करताना दिसेल.
एकुणात राष्ट्रवादीला “गरज असेल तिथे आघाडी” हे उघडपणे आणि राष्ट्रवादीला “गरज नसेल तिथे बिघाडी” हे छुपेपणाने शरद पवारांचे जुने धोरण राबवायचा राष्ट्रवादीचा मनसूबा आहे. नबाब मलिक यांच्या तोंडून त्यातला अर्धा भाग कालच्या पत्रकार परिषदेत उघड झाला आहे इतकेच. त्यातला इशारा शिवसेनेच्या नेतृत्वाने डोळे उघडून नीट वाचण्याची गरज आहे.

NCP`s election strategy to curtail shiv sena in mumbai and in rest of maharashtra by demolishing alliance prospects at core level

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात