विशेष प्रतिनिधी
मुंबई : तोंडाळ बोलून लांडगे आणि डुक्कर, ऐन गणेशोत्सवात नेत्यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल!!, असं खरंच घडलं आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. पण त्याचवेळी ते दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना लबाड लांडग्याचे पिल्लू म्हणाले. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना देखील लांडग्याचेच पिल्लू म्हटले. Political sledging in ganeshostav, gopichand padalkar targets ajit pawar, supriya sule targets BJP leaders
त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संतापून पडळकर दिसतील तिथे त्यांना ठोकण्याची भाषा केली, इतकेच नाहीतर एका हातगाडीवर डुकरे ठेवून त्यांच्या गळ्यात पडळकर अशा पाट्या अडकवून गोपीचंद पडळकर यांचा निषेध केला. हे सगळे ऐन गणेशोत्सव सुरू असताना घडले.
वास्तविक गोपीचंद पडळकर यांनी ते वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फटकारले होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विषय वाढवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला. अजित पवारांचा अपमान करण्यासाठी त्यांना भाजपने सत्तेत आपल्याबरोबर घेतले का??, असा सवाल त्यांनी केला. त्याचवेळी गोपीचंद पडळकर यांनी वेगवेगळ्या न्यूज चॅनेलला मुलाखती देऊन शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाने धनगर समाजाबरोबरच मराठा समाजाचा कसा घात केला, याचा मोठा पाढा वाचला. पवार कुटुंबाच्या गैरकृत्यांचे त्यांनी वाभाडे काढले.
पडळकर यांनी अजित पवारांना लबाड लांडग्याचे पिल्लू म्हटल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फटकारले, हे खरे पण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्यांचे वेगळ्या भाषेत समर्थन केले. अजित पवार हे महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना संजय राऊत रोज त्यांच्यावर टीका करायचे, मग त्यांना त्या टीकेची मूक संमती होती का??, असा बोचरा सवाल नितेश राणे यांनी केला.
पण या सगळ्या राजकीय गदारोळात ऐन गणेशोत्सवात आपण काय करतो आहोत?? एकमेकांना लांडगे आणि डुकरे म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळा चिखल करतो आहोत, हे मात्र हे नेते विसरले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App