बुरखा परिधान करून मुलींच्या वस्तीगृहात शिरलेल्या आयआयटी-चैन्नईच्या पदवीधर तरूणास अटक

Postal service officer sold secrets to pak spy in honey trap, arrested

जाणून घ्या नेमकं का त्याने असं केलं,  जीव देण्याचाही केला होता प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

चेन्नई :  प्रेयसिला भेटण्यासाठी बुरखा परिधान करून मुलींच्या वस्तीगृहात शिरलेल्या  आयआयटी-चेन्नई मधील एका पदवीधर तरूणाला कोट्टूरपुरम पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. या तरुणास अगोदरही पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये अटक केली होती. IIT Chennai graduate arrested for entering girls hostel wearing burqa

उत्तर प्रदेशमधील फत्तेपूरचा असलेल्या रोहन लाल या तरुणाने याचवर्षी इलेक्ट्रिकल इंजिअनिरिंगमध्ये एमएस केले आहे. आयआयटी- चैन्नईचे मुख्य सुरक्षा अधिकारी एस प्रकाश यांच्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहनने हा गुन्हा वारंवार  केला आहे. याअगदोर त्याने ४ ऑगस्ट आणि १६ फेब्रुवारी रोजी देखील मुलींच्या वस्तीगृहात शिरण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोमवारी विद्यार्थीनींना बुरखा परिधान केलाला व्यक्ती वस्तीगृहातील पाचव्या मजल्यावर आढळून आल्याने,  त्यांनी तत्काळ महिला सुरक्षा रक्षकास याबाबत कळवले आणि त्यांनी मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यास या प्रकाराबाबत माहिती दिली.

यानंतर जेव्हा सुरक्षा रक्षकांनी रोनहला पकडले तेव्हा त्यांनी इमरतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली  आणि गार्डला धक्काबुकी देखील केली. यानंतर  त्याच्याविरोधात तक्रार  दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केले  असता त्याला न्यायलयीन कोठडी सुनावली गेली.

IIT Chennai graduate arrested for entering girls hostel wearing burqa

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात