अनेक वर्षाची परंपरा राखत श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर 35000 महिलांनी केलं अथर्वशीर्ष पठण!


विशेष प्रतिनिधी

 पुणे : पुण्यात सार्वजनिक गणपती उत्सवाचा आनंद, उत्साह सर्वत्र दिसत आहे . काल मानाच्या पाच गणपती सोबतच श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या गणपतीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली .
ढोल ताशांच्या नादात पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली.PUNE GANPTI Festival Newsआज म्हणजेच ऋषिपंचमीच्या दिवशी गेल्या अनेक वर्षाच्या प्रथेप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज 35 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं आहे.ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आज ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 35 हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. पहाटेपासून महिलांनी रांगा लावल्या होत्या.महिलांनी पहाटेपासून गणरायाच्या नामाचा जयघोष सुरू केला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात वातावरण प्रसन्न झाल्याचे दिसून आले. गेल्या ३५ वर्षांपासून अथर्वशीर्ष पठणचा कार्यक्रम होतो आहे. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाचे हे 36 वे वर्ष आहे. पारंपारिक वेशात हजारो महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.(Latest Marathi News)अथर्वशीर्ष पठणच्या कार्यक्रमाला रशियन नागरिकांच्या एका गटाला पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. 35 हजार महिलांचा यामध्ये समावेश होता.

PUNE GANPTI Festival News

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात