पोलिसांकडून असा अंदाज वर्तवला जात आहे की , हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला आहे. Pimpri: Young man shot dead at Katepuram in Pimple Gurav; Young injured in attack
विशेष प्रतिनिधी
पिंपरी : शनिवारी (ता. १८) सकाळी पिंपळे गुरव मधील काटेपुरम येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली.यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे.हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव योगेश जगताप असे या हल्ल्यात आहे.
पिंपळे गुरव मध्ये सकाळी दहाच्या सुमारास योगेश्वर रस्त्यावर योगेश उभा असताना तेथे आलेल्या दोन ते तीन जणांनी त्याच्यावर गोळ्या झाल्या यामध्ये योगेश जखमी झाला.हल्लेखोरांनी योगेश्वर तीन गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांकडून असा अंदाज वर्तवला जात आहे की , हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला आहे.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास त्यासह नागरिकांकडे चौकशी करून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. नेमका हा हल्ला कोणत्या कारणामुळे घडला हल्लेखोर कोण आहेत, याचा पोलिस शोध घेत आहेत.यासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App