३१ डिसेंबरला संपणार समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ; कार्यकाळात कोणतीही मुदतवाढ नाही


 

समीर वानखेडे यांच्या कार्यकाळ संपण्यासाठी केवळ १३ दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र त्यांच्या मुदतवाढीचे कोणतेही संकेत आलेले नाही.Sameer Wankhede’s term ends on December 31; There is no extension in tenure


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता . या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी १२ लोकांना अटक करण्यात आले. या क्रुझ पार्टीचा तपास एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केला होता.दरम्यान क्रूझ पार्टी प्रकरणाच्या तपासावरच उच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

यामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. त्यामुळे एनसीबीकडून आर्यन खान प्रकरणाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आली.समीर वानखेडे यांच्या कार्यकाळ संपण्यासाठी केवळ १३ दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र त्यांच्या मुदतवाढीचे कोणतेही संकेत आलेले नाही.



समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपणार आहे.त्यामुळे समीर वानखेडेंना खुर्ची रिकामी करावी लागणा का? आणि समीर वानखेडेंच्या ऐवजी एनसीबीच्या विभागीय संचालकाच्या जागी आता नवीन अधिकारी येणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर मधल्या दिवसात समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होती.

त्यानंतर समीर वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून एनसीबीची स्पेशल टीम मुंबई दाखल झाली. त्यानंतर एनसीबीकडून समीर वानखेडे यांच्याकडे असलेली मुंबईतील काही प्रकरणे काढून घेण्यात आली.समीर वानखेडे यांना हटवल्यानंतर या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

Sameer Wankhede’s term ends on December 31; There is no extension in tenure

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात