Sameer Wankhede : सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुरावर बंदी घाला, समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयात याचिका


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. वानखेडे दाम्पत्याने गुगल, फेसबुक आणि ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर अशा सामग्रीवर बंदी घालण्यासाठी निर्देश मागितले आहेत. NCB Zonal Director Sameer Wankhede & his wife approached the Bombay City Civil Court at Dindoshi seeking directions to social media platforms defamatory contents against them


वृत्तसंस्था

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. वानखेडे दाम्पत्याने गुगल, फेसबुक आणि ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर अशा सामग्रीवर बंदी घालण्यासाठी निर्देश मागितले आहेत.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे देशभरात चर्चेत आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यासह अनेकांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या पत्नीविरोधात अनेक प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर दोघांनी आता दिंडोशी येथील बॉम्बे सिटी दिवाणी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म गुगल, फेसबुक आणि ट्विटरला त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर प्रदर्शित करणे किंवा प्रकाशित करणे थांबविण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

मलिकांना हायकोर्टाने फटकारले

मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना वानखेडे कुटुंबाविरुद्ध काहीही प्रसिद्ध करू नये, असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, वानखेडे कुटुंबाविरुद्ध थेट किंवा हातवारे करूनही भाषणबाजी करू नये. नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी समीरची आई जाहिदा यांचे मृत्यू प्रमाणपत्र शेअर केले होते. नवाब मलिकांचा दावा आहे की, त्यांची आई मुस्लिम होती आणि त्यांना ओशिवारा स्मशानभूमीत पुरण्यात आले. वानखेडे कुटुंबीयांनी जाहिदा यांची दोन मृत्यू प्रमाणपत्रेही बनवली असून एकात त्या मुस्लिम आहेत, तर दुसऱ्यात त्यांना हिंदू बनवण्यात आले आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नवाब मलिक यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात अनावश्यक वक्तव्य करू नये, अशी विनंती केली होती. याला आळा घालण्याचे आवाहन त्यांनी केले.

 NCB Zonal Director Sameer Wankhede & his wife approached the Bombay City Civil Court at Dindoshi seeking directions to social media platforms defamatory contents against them

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!