Gen Bipin Rawat Last Rites Live Updates : अमित शाह, राहुल गांधींनी CDS बिपिन रावत यांना वाहिली श्रद्धांजली, दुपारी 2 वाजता निघणार अंत्ययात्रा


तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर आज संध्याकाळी ७.१५ वाजता दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव त्यांच्या करज मार्गावरील निवासस्थानी नेण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जनरल रावत यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिली. Gen Bipin Rawat Last Rites Live Updates Amit Shah, Rahul Gandhi pay homage to CDS Bipin Rawat, Funeral procession will leave at 2 pm


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यावर आज संध्याकाळी ७.१५ वाजता दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे पार्थिव त्यांच्या करज मार्गावरील निवासस्थानी नेण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जनरल रावत यांच्या घरी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

सामान्य जनता सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत सीडीएस जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करू शकते. दुपारी 12.30 ते 13.30 या वेळेत लष्कराचे जवान त्यांना अखेरचा निरोप देतील. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पार्थिव दिल्ली कँट ब्रार चौकात नेण्यात येईल.

जनरल रावत यांना जेपी नड्डा यांनी वाहिली श्रद्धांजली

साधू-संतांनीही जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

द्रमुकचे नेते ए राजा आणि कनिमोझी यांनीही जनरल रावत व त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जनरल रावत यांचे अंत्यदर्शन घेतले.

जनरल रावत यांच्या दोन्ही कन्यांनी आपल्या आईवडिलांचे अंत्यदर्शन घेतले.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

गृहमंत्री अमित शहा यांनी जनरल रावत यांना श्रद्धांजली वाहिली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही जनरल रावत यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली.

लष्करी अधिकारी प्रोटोकॉल अंतर्गत जनरल रावत यांचे पार्थिव निवासस्थानी घेऊन जातात.

ब्रिगेडियर एल.एस. लिडर यांच्यावर अंत्यसंस्कार, कन्येने दिला मुखाग्नि

जनरल रावत यांच्यासह प्राण गमावलेले ब्रिगेडियर एल. एस. लिडर यांच्यावर आज ब्रार स्क्वेअर, दिल्ली कॅंट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी लष्कराच्या बेस हॉस्पिटलमधून त्यांच्या शंकर विहार येथील निवासस्थानी नेण्यात आले. लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरीही आले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही पोहोचले होते.

Gen Bipin Rawat Last Rites Live Updates Amit Shah, Rahul Gandhi pay homage to CDS Bipin Rawat, Funeral procession will leave at 2 pm

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात