पांढर्‍या सोन्याला शेवगावमध्ये झळाळी; उत्पादन कमी, दरवाढीने शेतकरी मालामाल


वृत्तसंस्था

अहमदनगर : अतिवृष्टीमुळे कपाशीचे क्षेत्र घटल्यामुळे पांढऱ्या सोन्याची आगार म्हणून ओळखले जाणारे शेवगाव तालुक्यात यंदा कापूस खरेदी व त्या माध्यमातून होणारी उलाढाल मंदावली ,असे चित्र सध्या शेवगाव मध्ये पहावयास मिळत आहे, मात्र कपाशीचे क्षेत्र व उत्पादन कमी असूनही दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला, आठ जिनिंग व खाजगी व्यापाऱ्यांमार्फत आतापर्यंत ५०हजाराहून अधिक क्विंटल कापूस खरेदी झाला आहे, त्यामुळे ३८ते ४० कोटींची उलाढाल झाली असल्याचे बोलले जात आहे.  The advantage of price hike despite low cotton area and production



तालुक्‍यात वाढलेले कपाशीचे क्षेत्र गेल्या वर्षापासून रोगराई अतिवृष्टी वेचनीची वाढलेली मजुरी व उत्पादन खर्च वाढल्याने कमी होऊ लागले आहे, गेल्या वर्षी पासून कमी खर्चात येणाऱ्या तुरीच्या व पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाचे क्षेत्र वाढत आहे, बोंड आळी रोगामुळे कपाशीचे पीक संकटात सापडले, यंदा कापसाला प्रति क्विंटल सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयांपर्यंत दर मिळत आहे, त्यामुळे कपाशीचे उत्पादन घटले तरी भाववाढीमुळे शेतकऱ्यांना चांगली मदत झाली आहे,

  • पांढर्‍या सोन्याला शेवगावमध्ये झळाळी
  • उत्पादन कमी असूनही कापसाला चांगला दर
  • दरवाढीने शेतकरी मालामाल
  • प्रति क्विंटल सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयांपर्यंत

The advantage of price hike despite low cotton area and production

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!