विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांपैकी निवडणूक यामधील चार जागांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. दोन जागांची निवडणुक होत आहे. या साठी आज मतदान होत असून महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये थेट सामना होत असल्याने यावेळी कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांच्यासमोर भाजपाचे वसंत खंडेलवाल यांचे आव्हान आहे. तर दुसरीकडे नागपूरमध्ये भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासमोर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचे आव्हान आहे. काँग्रेसने ऐनवेळी छोटू भोयर यांना दिलेली उमेदवारी मागे घेत मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला. Vidhan parishad election nagpur akola washim buldhana bjp congress shivsena
निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक जाहीर केली होती. यामधील चार जागा बिनविरोध पार पडल्या. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे.
निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाच काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार बदलत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. काँग्रेसने छोटू भोयर यांच्या जागी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केला. काँग्रेसने तसं पत्रक देखील काढलं आहे. छोटू भोयर यांना मात्र या निर्णयाबद्दल काहीच कल्पना नव्हती.
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढच पहायला मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नसल्याने निकाल काय असेल याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अपक्ष मतदार आणि वंचित बहुजन आघाडी यावेळी महत्वाची भूमिका निभावू शकतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more