‘एक दिवस ऊसतोड मजुरांसोबत’ : गोपीनाथ मुंडे जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंचा अनोखा संकल्प, कार्यकर्त्यांनाही केले भावनिक आवाहन


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त (12 डिसेंबर) संकल्प केला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. Pankaja Munde’s unique resolution on the occasion of Gopinath Munde’s birthday, also made an emotional appeal to the activists


प्रतिनिधी

बीड : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त (12 डिसेंबर) संकल्प केला आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी मुंडे समर्थकांना गडावर न येता ऊसतोड कामगार, कष्टकऱ्यांच्या समवेत एक दिवस राहून गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यासुद्धा या दिवशी ऊसतोड कामगारांसोबत उसाच्या फडावर असणार आहेत.

पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, पत्रात पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, 12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे तीन दिवस आपला वंचितांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतोय याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला, निस्सीम प्रेम करणाऱ्यांनाच जातं! तुमच्या एवढं सच्च, अनोखं नातं माझ्या जीवनात कोणतही नाही. प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो.

सामुदायीक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग-दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी अनेक कार्यक्रम आपण केले. अनेक मान्यवर अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय मंत्री, छत्रपती सर्व गडावर आले. अनेक दु:खी कुटुंबियांना मदत केली. अनेक रुग्णांचे इलाज झाले. खूप आशीर्वाद कमवले. हे आशीर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मूळी, हे चुकीच्या गोष्टी सुधारत असतील, सुधारण्यासाठी नाहीतर त्या गोष्टी आणि प्रवृत्तीशी स्वत:चे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशीर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात.कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं तुम्ही साहेबांवर आणि काकणभर जास्त माझ्यावर. नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणाऱ्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे!”

Pankaja Munde’s unique resolution on the occasion of Gopinath Munde’s birthday, also made an emotional appeal to the activists

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात