महाराष्ट्रातील असहायतेचे चित्र: वृद्ध पती आजारी पत्नीला खांद्यावर घेऊन रुग्णालयात पोचला खरा ; पण, ४ किमी चालूनही नाही वाचवू शकला जीव


वृत्तसंस्था

नंदुरबार: महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील चंदसैली घाट गावात बुधवारी अत्यंत दुःखद घटना घडली. पाऊस आणि भूस्खलनामुळे रस्ते बंद झाल्यामुळे, एका वृद्ध व्यक्तीला पत्नीला खांद्यावर घेऊन पायीच रुग्णालयात जावे लागले. ते चार किलोमीटरपर्यंत चालत गेले. पण पत्नी वाटेतच मरण पावली. मंगळवारी चंदसली घाटात भूस्खलन झाले. यानंतर मुख्य रस्त्याशी त्याचा संपर्क तुटला होता.Picture of helplessness Maharashtra: Elderly husband carries sick wife to hospital; Couldn’t save life even after walking 4 km

अडल्या पाडवी (वय ७०) , असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्यांची पत्नी सिदलीबाई (६५) यांची तब्येत बिघडली. प्रचंड ताप होता. कोणतेही वाहन गावात पोचू शकले नाही आणि पत्नीची प्रकृती खालावत चालली होती. अशा परिस्थितीत आडल्या यांनी पत्नीला खांद्यावर उचलून रुग्णालयात नेण्याचे ठरविले.



पत्नीचा जीव वाचला नाही

अडल्या पत्नीला खांद्यावर घेऊन सुमारे चार किलोमीटर चालत गेले. पण वयामुळे त्यांना खाली ठेवावे लागेल. मात्र, रुग्णालयात पोचल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, तापामुळे वाटेतच मृत्यू झाला आहे.

आदिवासी विकास मंत्री, पण विकास नाही

या घटनेमुळे चांदसली येथील आदिवासी समाजातील लोक शोकसागरात आहेत. विशेष म्हणजे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी हे सुद्धा याच भागातून येतात. या भागात रस्ते नाहीत.दरवर्षी चंदसली घाट भूस्खलनामुळे बंद होतो आणि हजारो आदिवासी गावांमध्ये अनेक दिवस कैद असतात. चंदसाली गावात आरोग्य सुविधा नाहीत. त्यामुळेच लोकांना उपचारासाठी नंदुरबार, तळोदा, धडगाव येथे जावे लागते.

स्फोट हे भूस्खलनाचे प्रमुख कारण

धडगाव येथे १३२ केव्ही उपकेंद्रासाठी टॉवर बांधला जात आहे. तो बांधण्यापूर्वी स्फोटकांचा वापर केला. यामुळे, येथील डोंगर कमकुवत झाले आहेत आणि दरडी हलक्‍या पावसातच कोसळत आहेत. नियमानुसार, स्फोट होण्यापूर्वी रस्त्याच्या कडेच्या डोंगरांचा भाग हा लोखंडी जाळीने झाकला पाहिजे. मात्र, ठेकेदार अशी कोणतीही खबरदारी घेत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

Picture of helplessness Maharashtra: Elderly husband carries sick wife to hospital; Couldn’t save life even after walking 4 km

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात