महाराष्ट्रातील पुणे बनणार औषधी वनस्पती निर्मितीचे केंद्र; औषधी वनस्पतींच्या लागवडीस मोठी सुरुवात


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पुणे आणि उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे औषधी वनस्पतीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात झाल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे पुणे हे भविष्यात औषधी वनस्पती निर्मितीचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.medicinal plants, cultivation program has started from Saharanpur & Pune: AYUSH

आजच्या घडीला कोरोना संक्रमणामुळे जगभरात योग् आणि आयुर्वेदाला अनन्य साधारण महत्व आले आहे. कारण रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता योग् आणि आयुर्वेदात आहे. आयर्वेदात औषधी वनस्पतींची मोठे महत्व आहे.



त्यासाठी मोठया प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड काळाची गरज बनली आहे. त्या अंतर्गत आता हा वन औषधी लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे.नॅशनल मेडिकल प्लांट बोर्डाच्या पुढाकाराने औषधी वनस्पतीची लागवडी केली जाणार आहे.

देशात विविध ठिकाणी औषधी वनस्पती लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. पुढील वर्षी देशभरात ७५ हजार हेक्टर क्षेत्रात औषधी वनस्पतींची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्याची सुरुवात पुणे आणि सहारणपुर येथे केली आहे.

medicinal plants, cultivation program has started from Saharanpur & Pune: AYUSH

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात