फिरवून फिरवून भाकरी पुन्हा खुर्चीत बसली!!; पवारांचा निवृत्तीचा निर्णय 3 दिवसांत मागे


विशेष प्रतिनिधी

मुंबई :फिरवून फिरवून भाकरी पुन्हा खुर्चीत बसली!!, असेच आज यशवंतराव चव्हाण सेंटरमधल्या पत्रकार परिषदेत दिसले. राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्ते, शेकडो नेते, देशातले सगळे विरोधी पक्षांचे नेते या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन शरद पवार पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर विराजमान झाले. Pawar’s retirement decision delayed in 3 days

यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये घेतलेल्या सायंकाळच्या पत्रकार परिषदेत पवारांनी तीन दिवसानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्याचवेळी पक्ष संघटनेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या नियुक्त्या नवे नेतृत्व याविषयी सहकार्याची विचार विनिमय करून निर्णय घेण्याची घोषणा केली. पवारांनी या संदर्भात एक निवेदन पत्रकार परिषदेत वाचून दाखविले. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर देशातल्या सर्व विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केलेल्या विनंतीचा मान राखत आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान होत असल्याचे जाहीर केले.

या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल आदी नेते उपस्थित होते. पवारांच्या आजच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या केडरमध्ये जल्लोष पसरला असून पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तात्विक भूमिकेसाठी आणि ध्येयधोरणांसाठी कार्यरत राहत असल्याचे जाहीर करून पुन्हा सक्रिय राजकीय जीवनात परतल्याचे स्पष्ट केले आहे.

त्याचवेळी नव्या नेतृत्वाच्या उभारणीसाठी काम करण्याचे सांगून नेहमीप्रमाणे सर्व शक्यतांची एक खिडकी ओपन ठेवली आहे.


 


संघटनात्मक पातळीवर करणार सर्जरी

पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले. फिरणारी भाकरी पुन्हा थांबली असे स्वतःच त्यांनी यात सांगितले. त्यामुळे प्रामुख्याने त्यांनी पक्ष संघटनेत अमुलाग्र बदल करण्याचे संकेत दिले. यामध्ये पक्षातील जिल्हास्तरावर 10 – 15 वर्षे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राज्य पातळीवर आणि राज्य पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली जाईल, असे सांगितले हाच एक प्रकारे अजितदादांचे संभाव्य बंड रोखण्याचा संघटनात्मक मार्ग आहे, असे सूचित केले.

अजितदादांबरोबर जाऊ शकतील असे जिल्हा पातळीवरचे आणि प्रदेश पातळीवरचे नेते यांना पवारांनी एक प्रकारे मधाचे बोट लावले आहे. स्वतः शरद पवारच आपल्याला बढती देऊन जिल्हा पातळीवरून प्रदेश पातळीवर आणि प्रदेश पातळीवरून देशपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी देत असतील, तर अजित पवारांकडे जाऊन फायदा काय??, असा अनेक पदाधिकाऱ्यांना प्रश्न पडू शकतो. त्या प्रश्नाचे उत्तर पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिले आहेत आणि एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस मधील संभाव्य फूट संघटनात्मक पातळीवर भविष्यातील ऑपरेशनची सर्व शक्यता ओपन ठेवून टाळली आहे.

Pawar’s retirement decision delayed in 3 days

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात