Parambir Singh : परमबीर सिंग म्हणाले- 100 कोटींच्या वसुली प्रकरणात पवार, ठाकरेंचा हस्तक्षेप; सर्वकाही त्यांच्या सूचनेनुसार होत होते

Parambir Singh

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Parambir Singh  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या टार्गेटचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय उचलून धरला होता, त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार चांगलेच अडचणीत आले होते. या प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांनी अनिल देशमुख आणि सचिन वाझे हे फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणाले होते. तसेच या सगळ्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून हे सगळे होत असल्याचे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.Parambir Singh



न्यायमूर्ती चांदिवाल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले होते की, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे हे देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच सचिन वाझेने आपल्याला राजकीय नेत्यांचे नावे घेत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. या सगळ्या प्रकरणात ठाण्याचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील लक्ष घालत असल्याचे सांगितले होते. याला माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दुजोरा दिला आहे. चांदिवाल योग्यच सांगत आहेत. लक्ष्मीकांत पाटील बदल्यांच्या प्रकरणात आणि वसूलीच्या प्रकरणात थेट सहभागी होते, असे परमबीर सिंग म्हणाले आहेत.

पुढे बोलताना परमबीर सिंग म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरून लक्ष्मीकांत पाटील या प्रकरणात हस्तक्षेप करत होते. साक्षीदारांवर लक्ष्मीकांत पाटील दबाव आणत होते. त्यांनी या प्रकरणात पूर्णपणे हस्तक्षेप केला होता. महाविकास आघाडी सरकार असताना अनिल देशमुख हे सातत्याने पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये ढवळाढवळ करत होते, असा आरोपही परमबीर सिंग यांनी केला आहे.

परमबीर सिंग म्हणाले, मी चांदिवाल आयोगासमोर माझ्याकडे असणारे पुरावे मेसेजेस आणि इतर अधिकाऱ्यांनी मला जे सांगितले खंडणीची मागणी कशी मागितली होती हे सर्व मी सांगितले होते. मी त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अनिल देशमुख यांचा पोलिसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप असल्याचे देखील सांगितले होते. याचे सर्व पुरावे मी सीबीआय आणि ईडीला दिले असल्याचे परमबीर सिंग म्हणाले आहेत.

Parambir Singh said- Pawar, Thackeray’s intervention in the recovery case of 100 crores

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात