विशेष प्रतिनिधी
मुंबई : Prithviraj Chavan विधानसभा निवडणूक तोंडावर आली तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वादाचे कवित्व अजूनही संपले नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी मविआच्या जागावाटपातील चुकांवर बोट ठेवले. आमच्या मित्रपक्षांनी आपल्या जागांचा आकडा वाढवण्यासाठी दिलेले काही उमेदवार निवडून येण्याची अजिबात शक्यता नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण एका मुलाखतीत बोलताना म्हणाले की, काँग्रेसने दावा केलेल्या जागांवर मित्रपक्षाने अगदीच चुकीचे उमेदवार दिले. त्यांनी आपल्या जागांचा एकूण आकडा वाढवण्यासाठी असे केले. पण त्यांनी दिलेल्या उमेदवारांची निवडून येण्याची कोणतीही शक्यता नाही. हे उमेदवार कोणत्या पक्षाचे आहेत हे मी सांगणार नाही. काही ठिकाणी काँग्रेसचेही उमेदवार बंडखोर झालेत. दोन-तीन उदाहरणे माझ्या डोळ्यांपुढे आहेत. हे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. पण पुढे नेमके काय होईल? हे मला माहिती नाही.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत काही चुका झाल्या. या चुका प्रामुख्याने दोन गोष्टींमध्ये झाल्या. उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी त्यांच्या नेत्यांना वाटाघाटीसाठी पाठवले. ते स्वतः प्रचारासाठी मोकळे राहिले. याऊलट आमच्या बाजूने सर्वच नेते स्वतः वाटाघाटीसाठी गेले. यामुळे रस्त्यावर कुणीच उरले नाही. काँग्रेस पक्षाने अंतर्गत बैठक घेऊन, या मुद्यावर गांभीर्याने चर्चा करून जागावाटपावरील आपली भूमिका ठरवण्याची गरज होती.
जागावाटपात सुरुवातीला अवास्तव भूमिका मांडण्या आली. म्हणजे हे ही चांगले आणि ते ही चांगले. पण प्रत्यक्ष चर्चेला गेल्यानंतर त्यातील काहीची झाले नाही. वाटाघाटीत काँग्रेस कमी पडली हे आम्ही मान्य करोत. पण या प्रकरणी फार चुका झाल्या असे काहीही नाही. पहिली यादी फार चांगली होती. दुसऱ्या यादीत तडजोडी कमी झाल्या. पण काँग्रेसला जागावाटपात फार जास्त जागा मिळणे व्यवहार्य नव्हते हे तेवढेच खरे होते, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App