संविधान रॅलीत पवार नाहीत; 25 नोव्हेंबरला राहुल गांधी – उद्धव ठाकरे – प्रकाश आंबेडकर शिवाजी पार्क एकत्र??

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद पेटला असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर 25 नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर संविधान रॅली घेत आहेत. November 25 Rahul Gandhi – Uddhav Thackeray – Prakash Ambedkar Shivaji Park together?

या संविधान रॅलीचे निमंत्रण काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्याचे घाटत आहे. त्यामुळे त्या दिवशी मुंबईत राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा ट्विस्ट येण्याची देखील शक्यता आहे.

कारण प्रकाश आंबेडकरांनी या संविधान रॅलीसाठी शरद पवारांना निमंत्रण दिल्याची माहिती दिलेली नाही. उलट राहुल गांधींना आणि ठाकरे गटाला निमंत्रण देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.


राहुल गांधींचा जबलपूरचा रोड शो राजकुमार ब्रास बँडने वाजवला!!


प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी संविधान रॅली आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केलं. येत्या 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता दादरच्या शिवाजी पार्कात ‘संविधान के सन्मान में’ या रॅली आयोजितन केल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या रॅलीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आम्हाला शिवाजी पार्क पोलिस ठाण्यातून रॅलीसाठी नुकतीच परवानगी मिळाली आहे. रॅलीसाठीचा वेळ कमी आहे. तरीही आम्ही राहुल गांधी यांना आमंत्रित करत आहोत. ते येतील अशी आशा आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आंबेडकर आणि राहुल गांधी एकाच मंचावर येण्याची शक्यता बळावली आहे.

ठाकरे गटालाही निमंत्रण

या रॅलीसाठी ठाकरे गटालाही निमंत्रित करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आमची युती आहे. त्यामुळे ठाकरे गटालाही रॅलीचं निमंत्रण देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. संविधान वाचवणे हे राजकारणाच्या पलिकडे आहे, असे आमचे मत आहे, असंही ते म्हणाले.

तर स्वातंत्र्य धोक्यात येईल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर रोजी मसुदा समितीच्या वतीने संविधान सादर केले. जाती आणि धर्माचे राजकारण केंद्रस्थानी घेतल्यास राष्ट्राचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. भाजप आणि आरएसएसने पुन्हा धर्म आणि जातीवरून राजकारण सुरू केले आहे, असे आमचे ठाम मत आहे. हे केवळ आपल्या लोकशाहीला बाधा आणणार नाही तर आपले स्वातंत्र्य देखील कमी करेल. राज्यघटना सौहार्द, स्वातंत्र्य आणि समानतेची मागणी करते. जी वैदिक परंपरेत पाळली जात नाही, असं ते म्हणाले.

November 25 Rahul Gandhi – Uddhav Thackeray – Prakash Ambedkar Shivaji Park together?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात