विशेष प्रतिनिधी
जबलपूर : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखा वयोवृद्ध नेत्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बसविले असले तरी, राहुल गांधी हेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठे स्टार प्रचारक आहेत. राहुल गांधींच्या चेहऱ्यावरच पाच राज्यांची विधानसभा निवडणूक अघोषित पद्धतीने लढवली जात आहे. Rahul Gandhi’s road show to Jabalpur was played by Rajkumar Brass Band
त्यामुळे पाचही राज्यांमध्ये फक्त राहुल गांधींचाच चेहरा प्रचार सभांमध्ये प्रत्यक्ष प्रचार रॅलीमध्ये आणि रोड शो मध्ये मोठा दिसतो. राहुल गांधींनी आज मध्य प्रदेशातल्या जबलपूर पश्चिम मतदारसंघात रोड शो केला. त्यावेळी तो रोड शो राजकुमार ब्रास बँडने वाजवला. राहुल गांधींच्या रोड शो मध्ये जबलपूर मधला राजकुमार ब्रास बँड आघाडीवर होता. तो वेगवेगळी गाणी वाजवत होता. या राजकुमार ब्रास बँडचा आणि रोड शो चा व्हिडिओ स्वतः राहुल गांधींनी आपल्या यूट्यूब चैनल वर शेअर केला आहे.
राहुल गांधी आणि “राजकुमार” ही दोन्ही नावे एकमेकांशी संलग्न आहेत. राहुल गांधींचा परिवार देशातली फर्स्ट पॉलिटिकल फॅमिली म्हणून ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक विरोधक राहुल गांधींवर ते “राजकुमार” असल्याचीच टीका करत असतात. आज स्वतःच राहुल गांधींनी राजकुमार ब्रास बँडचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर शेअर करून ते “सिद्ध” करून दाखविले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App