आजही भारतीय जवान सीमेवर दहशवतवादी कारवायांना तोंड देत आहे आणि घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की, बीसीसीआयने फार पूर्वीच ठरवले होते की, जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि भारतात घुसखोरी थांबवत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत द्विपक्षीय क्रिकेट होणार नाही. दोन शेजारी देशांमधील वाढत्या राजनैतिक तणावामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय क्रिकेट संबंध वर्षानुवर्षे बंद आहेत, दोन्ही संघ केवळ विश्वचषक आणि आशियाई स्पर्धांमध्ये एकमेकांसोबत खेळतात. No bilateral cricket ties with Pakistan until terrorism and infiltration are stopped Anurag Thakur
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, ‘क्रिकेटबाबत बोलायचे झाले तर, बीसीसीआयने फार पूर्वीच ठरवले होते की पाकिस्तानसोबतचे द्विपक्षीय सामने जोपर्यंत दहशतवादी कारवाया आणि घुसखोरी थांबवत नाहीत तोपर्यंत ते होणार नाहीत. या देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाची हीच भावना मला वाटते.”
अलीकडेच दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे उपअधीक्षक शहीद झाल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याशिवाय आजही भारतीय जवान सीमेवर दहशवतवादी कारवायांना तोंड देत आहे आणि घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहेत.
भारतीय पुरुष क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेत असून आशिया चषक २०२३ मध्ये खेळत आहे. सध्याच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोनदा एकमेकांसोबत खेळले आहेत. त्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी मोठा पराभव केला. आशिया चषक 2023 हे संपूर्णपणे पाकिस्तानमध्ये आयोजित केले जाणार होते, परंतु बीसीसीआयने भारत सरकारची परवानगी नसल्यामुळे ते आपला संघ पाठवू शकत नसल्याचे सांगितले. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची अगोदर धमकी दिली होती. मात्र आता त्यांनी खेळण्यास होकार दर्शवला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App