Maharashtra Corona Updates :राज्यामध्ये शनिवारी आढळले १०,९६२ नवीन रुग्ण, १४,९१० जणांना डिस्चार्ज; १,५५,४७४ ॲक्टिव्ह रुग्ण


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यात शनिवारी १०६९७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १४९१० जणांना डिस्चार्ज दिला आहे. ३६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकंदरीत बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे, राज्यात सध्या एकूण १,५५,४७४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. new patients found in the state on Saturday,14,910 discharged; 1,55,474 active patientsa reservation

एकूण ५६,३१७६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४८ टक्के आहे. ३६० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.  सध्या मृत्यूदर १.८४  टक्के आहे.



आजपर्यंत तपासलेल्या ३,७८,३४,०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,९८,५५० (१५.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात ९,६३,२२७व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ५८०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत २४ तासात ७३३ जणांना कोरोना

मुंबईत गेल्या२४ तासात ७३३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ७३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुण्यात ३३१ नव्या रुग्णांची नोंद

पुणे शहरात शनिवारी नव्याने ३३१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या आता ४ लाख ७३ हजार ८७० झाली. ४५९ जणांना शनिवारी डिस्चार्ज दिला असून एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६२ हजार २२२ झाली आहे.

उपचार घेणाऱ्या ३ हजार १८२ रुग्णांपैकी ५१७ रुग्ण गंभीर तर ८६२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत १० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ८ हजार ४६६ झाली आहे.

new patients found in the state on Saturday,14,910 discharged; 1,55,474 active patientsa reservation

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात