Maharashtra Corona Updates Todays Corona Cases Updates in Maharashta and Mumbai See Details

Maharashtra Corona Updates : राज्यात दिलासादायक चित्र, कोरोना रुग्णसंख्या पूर्वीपेक्षा निम्मी, दुप्पट रुग्ण बरे, 24 तासांत 974 मृत्यू

राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाल्यापासून आता पहिल्यांदाच दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. पहिल्यांदा कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. एका आठवड्यापूर्वी जेथे 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते, तेथे आता मागच्या 24 तासांत 34,389 नव्या रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर याच काळात 59,318 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. Maharashtra Corona Updates Todays Corona Cases Updates in Maharashta and Mumbai See Details


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाल्यापासून आता पहिल्यांदाच दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. पहिल्यांदा कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. एका आठवड्यापूर्वी जेथे 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळत होते, तेथे आता मागच्या 24 तासांत 34,389 नव्या रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर याच काळात 59,318 रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

24 तासांत आढळलेले नवे रुग्ण : 34,389
24 तासांत बरे झालेले रुग्ण : 59,318
24 तासांत मृत्यूंची संख्या : 974
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 48,26,371
आतापर्यंत एकूण मृत्यू : 81,486
आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या : 53,78,452
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या : 4,68,109

नव्या रुग्णसंख्येबाबत दिलासादायक चित्र असले तरी मृतांच्या संख्येने चिंता वाढवली आहे. राज्यात मागच्या 24 तासांत 974 मृत्यू झाले आहेत. याबरोबरच राज्यातील एकूण मृतांची संख्या वाढून 84,486 वर गेली आहे. राज्यात आज नव्या रुग्णांची भर पडून सक्रिय रुग्णसंख्या 4,68,109 झाली आहे.

दुसरीकडे, मुंबईतही 24 तासांत 1544 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली तेव्हा दररोज 7 ते 8 हजारांपर्यंत रुग्ण मुंबईत आढळत होते. त्या तुलनेत आताची स्थिती अत्यंत दिलासादायक बनली आहे. मागच्या 24 तासांत बरे झाल्याने 2438 रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. तर याच काळात 60 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 35,702 सक्रिय रुग्ण आहे.

Maharashtra Corona Updates Todays Corona Cases Updates in Maharashta and Mumbai See Details

महत्त्वाच्या बातम्या