लसींवरून पुन्हा राजकारण, राहुल गांधी-प्रियांका गांधींनी ज्या पोस्टरचे डीपी ठेवले, त्या पोस्टरमागचा सूत्रधार ‘आप’ नेता फरार

AAP Leader Behind Posters in Delhi, Rahul Gandhi And Priyanka Gandhi used It As Profile Photo Criticizing Modi On Exporting Vaccine

AAP Leader Behind Posters in Delhi : देशात मुद्दा कोणताही असो राजकारण नेहमी टोकाचे केले जाते. एकीकडे देश कोरोना संकटाशी संघर्ष करत असताना दुसरीकडे नेतेमंडळी मात्र राजकारणच करण्यात मश्गुल असल्याचे दिसते. भारतात लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हा या लसींवर शंका घेणाऱ्या नेत्यांना नंतर स्वत:ला लस टोचून घेण्यात कमीपणा वाटला नाही. भारताने माणुसकीच्या नात्याने व व्यावसायिक उत्तरदायित्व म्हणून परेदशात पाठवलेल्या लसींवरून अजूनही राजकारण सुरू आहे. दुसरी लाट सुरू होण्याच्या आधी भारताने विविध देशांना केलेल्या मदतीमुळेच संकटकाळात पुन्हा भारताच्या मदतीला इतर देश धावून आले, याकडे विरोधक डोळेझाक करतात. AAP Leader Behind Posters in Delhi, Rahul Gandhi And Priyanka Gandhi used It As Profile Photo Criticizing Modi On Exporting Vaccine


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात मुद्दा कोणताही असो राजकारण नेहमी टोकाचे केले जाते. एकीकडे देश कोरोना संकटाशी संघर्ष करत असताना दुसरीकडे नेतेमंडळी मात्र राजकारणच करण्यात मश्गुल असल्याचे दिसते. भारतात लसीकरणाला सुरुवात झाली तेव्हा या लसींवर शंका घेणाऱ्या नेत्यांना नंतर स्वत:ला लस टोचून घेण्यात कमीपणा वाटला नाही. भारताने माणुसकीच्या नात्याने व व्यावसायिक उत्तरदायित्व म्हणून परेदशात पाठवलेल्या लसींवरून अजूनही राजकारण सुरू आहे. दुसरी लाट सुरू होण्याच्या आधी भारताने विविध देशांना केलेल्या मदतीमुळेच संकटकाळात पुन्हा भारताच्या मदतीला इतर देश धावून आले, याकडे विरोधक डोळेझाक करतात.

पोस्टरबाजांना अटक ही लॉकडाऊन उल्लंघनामुळे

दिल्लीतील पोस्टरबाजीवरूनही आता राजकारण सुरू झाले आहे. राजधानी दिल्लीत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झालेले असताना एवढ्या मोठ्या संख्येने पोस्टर लागलेच कसे? हाही प्रश्न आहेच. कोरोना नियमावलीचा भंग केल्याचा ठपका ठेवत दिल्ली पोलिसांनी पोस्टरबाजांवर कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात गस्त घालत असताना दिल्ली पोलिसांना विविध भागांमध्ये पोस्टर चिकटवल्याचे आढळले. लॉकडाऊनच्या नियमभंगामुळे कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात आली ज्यात 25 जणांना अटक करण्यात आली आहे. तथापि, या सर्व पोस्टरमागचा मुख्य सूत्रधार आप नेता आता फरार आहे.

पोस्टरबाजीमागे आप नेत्याचा हात, आता फरार

दिल्ली पोलिसांनी यासंबंधीचे पुरावेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिले आहेत. आम आदमी पक्षाचे नेते व वॉर्ड 47चे अध्यक्ष अरविंद गौतम यांनी हे पोस्टर छापून घेऊन ते विविध भागांत चिकटवल्याचे यावरून दिसून येते. अरविंद गौतम सध्या फरार झाले आहेत.

राहुल गांधी, प्रियांका गांधींकडून पोस्टर डीपीवर

दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी त्या पोस्टरचाच फोटो आपापल्या ट्वीटर प्रोफाइलवर लावला आहे. राहुल गांधींनी तर मलाही अटक करा, असे ट्वीट केले आहे. विशेष म्हणजे या दिग्गज काँग्रेस नेत्यांनी तथ्य समोर येण्याची अजिबात वाट न पाहता निषेध नोंदवून मोकळे झाले. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांच्या खुलाशानंतर राहुल गांधी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पोस्टर लावण्यासाठी मिळाले 500 रुपये

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक एफआयआर द्वारकामध्ये नोंदवून दोन जणांना अटक करण्यात आली. तर उत्तर दिल्लीमध्ये एका एफआयआरवरून एकाला अटक करण्यात आली. या व्यक्तीने सांगितले की, हे पोस्टर चिकटवण्यासाठी त्याला पाचशे रुपये देण्यात आले होते. याशिवाय एक एफआयआर दक्षिण पश्चिम जिल्ह्यात नोंदवून दोन जणांना अटक करण्यात आली. याशिवाय एक गुन्हा शाहदरा जिल्ह्यातही नोंदवण्यात आला. दिल्ली पोलिसांनी स्पट सांगितले आहे की, लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये विविध भागांमध्ये 25 गुन्ह्यांची नोंद झाली, याअंतर्गत 25 जणांना अटक झाली आहे.

AAP Leader Behind Posters in Delhi, Rahul Gandhi And Priyanka Gandhi used It As Profile Photo Criticizing Modi On Exporting Vaccine

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण